भूखंड स्वच्छतेची जबाबदारी रहिवाशांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:13 AM2018-02-08T00:13:13+5:302018-02-08T00:13:44+5:30
खुल्या जागांवर कचरा न टाकता ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही शहरातील रहिवाशांची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी बुधवारी गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यात बोलताना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील मोकळे भूखंड हे तेथील रहिवाशांच्या परवानगी घेऊनच हस्तांतरित केले जातील. मात्र, तोपर्यंत या भूखंडांवर कोणत्याही अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच शहर स्वच्छतेचे उद्दिष्ट लक्षात घेत खुल्या जागांवर कचरा न टाकता ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही शहरातील रहिवाशांची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी बुधवारी गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यात बोलताना केले.
शहरातील सहकार बॅक कॉलनी परिसरातील श्री गजानन मंदिरात शेगाव निवासी संत श्रेष्ठ समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन बुधवारी विविध धार्मिक उपक्रमांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी दर्शनासाठी उपस्थित असलेले शेकडो भाविकांनी केलेल्या गण गण गणांत बोते, गजानन महाराज की जय अशा जयघोषांनी संपूर्ण मंदिर परिसरातील आसमंत दणाणून गेला.
यावेळी कार्यक्रमाला माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, नगरसेवक अरुण मगरे, रवंीद्र जगदाळे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आर्दड, सचिव संपतराव पाटील, दिपक अंभोरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, सत्तावीस वर्षांपासून या परिसरात धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता हे देवाचे रुप असून, स्वत:च्या घराप्रमाणे प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जोधळे यांनी नागरिकांना केले. याप्रसंगी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सूत्रसंचालन आशिष रसाळ यांनी केले. तर किशोर खैरे यांनी आभार मानले.
प्रकटदिन सोहळ्याच्या कार्यक्रमासा श्रीराम जुनगडे, वामनराव कदम, मारोतराव वानखरे, सोपानराव लोखंडे, रमाकांत पिंपळे, किशोर बिन्नीवाले, किशोर खेरे, भगवानराव भाकरे, दिगंबरराव पळसकर, पद्माकर शिंदे, संभेराव, श्रीमंत जºहाड, मनोहर लांडे, उमेश देशमुख, छोटु देशमुख, मुकेश भडांगे, सुहास मुंढे, प्रभाकर शिंदे, संजय कापसे, मुरलीधर कवठे, प्रल्हाद पवार, नारायण कोरडे, अंकुश खैरे, नीलेश शिंदे, नंदूसिंग राठोड, सतीश जाधव, विनोद चौबे, सचिन पाटील, गणेश जुनगडे, ओंकार पिंपळे, गणेश जैस्वाल, रक्कटे, देशपांडे, मोताळे यांच्यासह शहर परिसरातील महिला व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.