ग्रा.पं.च्या सामान्य फंडात ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:55 AM2018-04-12T00:55:47+5:302018-04-12T00:55:47+5:30
१२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील १२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रामपंचायत कार्यालयाचे वार्षिक नियोजन सामान्य फंडावर अवलंबून असते. कारण गावातून जमा होणाऱ्या विविध करामधून ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन, पथदिवे लावणे, गावातील नाल्यांची साफसफाई, याशिवाय वेळेवर येणारी कामे सुध्दा सामान्य फंडातून करावा लागतो. मात्र तालुक्यातील अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सामान्य फंड खाते निरंक आहे. मात्र सरपंच आणि ग्रामसेवकाने कर वसुलीसाठी म्हणावे तसे प्रयत्नच करण्यात येत नसल्याने याचा परिणाम ग्रामपंचायत विकासावर झाला आहे. गावागावा राजकीय हस्तक्षेपामुळे सुध्दा कर वसुलीस मर्यादा येत असल्याचे सागण्यात येत आहे.यामुळे अनेक गावात पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. विशेष म्हणणे सामान्य फंडात पैशाअभावी ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन सुध्दा वर्षानुवर्ष प्रलंबीत राहत आहे. यामुळे कर्मचा-यांना संसाराचा गाडा घाकणे दिवसेदिवस कठीण झाले आहे. अनेक वेळा गटविकास अधिका-याकडून गावस्तरावर कर वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येतात. मात्र कर भरण्यास नागरिकांची सुध्दा उदासिनता असल्याने म्हणावी तशी वसुली होण्यास अडचणी येत असल्याने सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून गावात पिण्याच्या पाणी, दिवाबत्ती, रस्ते दुरूस्ती आदी कामे करण्यात येतात. ग्रामपंचात कडून विविध सुविधा पुरविल्यानंतर सुध्दा नागरिकाकडून कर भरण्याबाबात दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी ग्रामसेवकांनी कर वसुलीबाबात केलेल्या प्रयत्नासुध्दा यश येत नाही. परिणामी वसुली रखडली जात असल्याचे सांगण्यात येते.