भगवान गिरी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:23 AM2021-06-02T04:23:05+5:302021-06-02T04:23:05+5:30

खंडित वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे उकाड्याने त्रस्त ...

Respect to Lord Giri | भगवान गिरी यांचा सत्कार

भगवान गिरी यांचा सत्कार

googlenewsNext

खंडित वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय

घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक हैराण झाले आहेत. शिवाय फळपिकांना पाणी देताना शेतकऱ्यांनाही तासन् तास विजेची वाट पाहावी लागते. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

शहरातील नाल्यांची साफसफाई होईना

भोकरदन : नाल्यातील सफाईची कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. आता पावसाळा सुरू होत असतानाही भोकरदन शहरातील नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. यावर्षीसुध्दा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असे असतानाही नगर पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

जामवाडी येथे जयंतीनिमित्त अभिवादन

जालना : जालना तालुक्यातील जामवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाढेकर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुधाकर वाढेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी भाऊलाल पवार, सरपंच विजय वाढेकर, माणिक खरात, सरपंच विजय वाढेकर आदींची उपस्थिती होती.

घनसावंगी परिसरात पावसाची हजेरी

घनसावंगी : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना सोमवारी दुपारी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. घनसावंगी परिसरात सोमवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारी एकपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

बदनापूर येथे जयंती साजरी

बदनापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कडेगाव येथे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी गणेश कोल्हे, हभप रामेश्वर महाराज कोल्हे, रामनारायण कोल्हे, संभाजी चांगुलपाये, विमलबाई कोल्हे, गयाबाबई जोशी, रंजना कोल्हे, सारजाबाई बकाल, कांताबाई कोल्हे, अनिता लांडे, रेणुका कोल्हे आदींची उपस्थिती होती.

विजेअभावी पाणी पुरवठा विस्कळीत

राजूर : भोकरदन तालुक्यातील बाणेगाव मध्यम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असतांना अपुरा वीजपुरवठा होत असल्याने राजूरसह १५ गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चांदई ठोंबरी रोहित्रला पाणी पुरवठ्यासाठी सलग बारा तास सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे.

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

मंठा : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय कायदा - सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे. दारूमुळे निर्माण होणाऱ्या समस्या पाहता संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पथदिवे दिवसाही सुरूच

जालना : शहरांतर्गत विविध भागातील बहुतांश पथदिवे दिवसाही सुरू राहत आहेत, तर काही भागातील पथदिवे बंद पडले आहेत. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.

कारवाईची मागणी

जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. दारुमुळे भांडण - तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. याचा महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असून, दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

रस्ता दुरूस्तीची गरज

जालना : शहरांतर्गत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असून, संबंधितांनी रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

सूचना फलक गायब

भोकरदन : तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोकरदन शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात या मार्गावरील दिशादर्शक, सूचना फलक गायब झाल्याने चालकांची गैरसोय होत आहे. संबंधितांनी हे फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

वाहन चालकांची कसरत

परतूर : शहरांतर्गत विविध भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. ही बाब पाहता नगर पालिकेने लक्ष देऊन शहरांतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Respect to Lord Giri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.