सौंदर्य कार्यशाळेस सखींचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:06 AM2018-02-26T01:06:15+5:302018-02-26T01:08:22+5:30
लोकमत सखी मंचच्यावतीने ब्रायडल मेकअप स्पर्धा आणि सौंदर्य कार्यशाळेचे आयोजन शनिवारी पार पडली. मधूर बँक्वेट, मिशन हॉस्पिटलसमोर, दुर्गामाता रोड जालना येथे पार पडलेल्या स्पर्धेत सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकमत सखी मंचच्यावतीने ब्रायडल मेकअप स्पर्धा आणि सौंदर्य कार्यशाळेचे आयोजन शनिवारी पार पडली. मधूर बँक्वेट, मिशन हॉस्पिटलसमोर, दुर्गामाता रोड जालना येथे पार पडलेल्या स्पर्धेत सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेचे उदघाटन हर्षा अॅण्ड संजयचे संचालक संजय इंगळे, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, इव्हेंटचे शैलेश देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यशाळेत संजय इंगळे यांनी सखींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी ब्रायडल मेकअपचे प्रात्यक्षिक व सौंदर्याविषयी सखोल माहिती देऊन सध्या बाजारात सुरु असलेल्या ट्रेण्डबाबत अवगत केले. या कार्यशाळेसाठी हर्षा अॅण्ड संजय नॉलेज पार्टनर तर मधूर बॅक्वेट हे व्हेन्यू पार्टनर होते. या स्पर्धेसाठी राधिका सुवर्णकार, अस्मिता म्हस्के, पुष्पा वाघमारे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना सोनाली जयपुरिया यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
प्रथम विजेता
मिताली उपाध्याय
रनर अॅण्ड बेस्ट मेकअप
सविता साळवे
बेस्ट हेअर डू - रंजीता लोढा
बेस्ट आय मेकअप - अर्चना कुटे
बेस्ट मॉडेल - भाग्यश्री शिंगे
बेस्ट ज्वेलरी - सपना पटेल
बेस्ट कॉस्ट्यूम - अंजली शर्मा
उत्तेजनार्थ
ज्योती उढाण, वर्षा जगताप, राजवानी अवधूत