माळशेंद्रा येथील मोफत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:34 AM2021-08-12T04:34:01+5:302021-08-12T04:34:01+5:30
कुंभार पिंपळगाव ते कोठाळा बससेवा सुरू घनसावंगी : अंबड आगाराची कुंभार पिंपळगाव ते कोठाळा बुद्रुक ही मानव विकास ...
कुंभार पिंपळगाव ते कोठाळा बससेवा सुरू
घनसावंगी : अंबड आगाराची कुंभार पिंपळगाव ते कोठाळा बुद्रुक ही मानव विकास मिशन बससेवा सोमवारी सुरू झाली. या बससेवेमुळे मार्गावरील कोठाळा बुद्रुक, घाणेगाव, भेंडाळा आदी गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दररोज शिक्षणासाठी येथील विद्यार्थी व विद्यार्थिंनींना कुंभार पिंपळगाव येथील शाळा व महाविद्यालयात यावे लागते.
लालबावटा युनियनचे मंठ्यात आंदोलन
जालना : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा संघटनेच्या वतीने ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त सोमवारी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सचिन थोरात, श्रावण शिंदे, कालिंदा थोरात, मैनाजी पितळे, सिद्धार्थ देशमाने, दीपक गोंडगे, कलावती भोंगाळ, शिवाजी खंदारे, दत्ता बोराडे, सदाशिव होगाडे आदींची उपस्थिती होती.
नीता म्हस्के यांची निवड
अंबड : तालुक्यातील खडकेश्वर येथील नीता म्हस्के यांची राज्य पोलीसपाटील असोसिएशनच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाध्यक्ष मोरे व कार्याध्यक्ष बबन डोळस यांनी केली. यावेळी रामचंंद्र वाघमारे, रवींद्र डोईफोडे, ईश्वर वाघमारे, कैलास गुंजाळ आदींची उपस्थिती होती.
चंद्रकांत दानवे यांचा सत्कार
वालसावंगी : भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांची नुकतीच तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानिमित्त दानवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव गजानन गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर भुते आदींनी नुकताच सत्कार केला आहे.