बंदला जालना जिल्ह्यात दणदणीत प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:32 AM2018-01-04T00:32:34+5:302018-01-04T00:32:39+5:30
भीमा - कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या हाकेला ्रजिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भीमा - कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या हाकेला ्रजिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात आणि शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर व्यापा-यांनीदेखील दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला.
जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लक्ष ठेवले. भारिप बहुजन महासंघ आणि इतर संघटनांनी बंद पुकारल्यानंतर शहरातील मामा चौकात भीम अनुयायी एकत्र जमले आणि मोर्चा निघाला. हा मोर्चा मुथा बिल्डींग, मम्मादेवी, गांधी चमन, शनि मंदिर, नूतन वसाहतमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. तसेच २ जानेवारी रोजी दलित समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यामध्ये भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके, अॅड. शिवाजीराव आदमाने, अॅड. कैलास रत्नपारखे, संदीप खरात, अकबर इनामदार, अण्णा सावंत, प्रमोद खरात, अण्णासाहेब चित्तेकर, विकास लहाने, राहुल भालेराव, रवि म्हस्के, प्रा. सत्संग मुंडे, महेंद्र रत्नपारखे, राजेंद्र राख, कपिल खरात, सुशील वाघमारे, अनिल मिसाळ, जगन्नाथ ठाकूर, गणेश चांदोडे, विष्णू खरात, राहुल रत्नपारखे, राहुल खरात, परमेश्वर वाहुळे, विजय लहाने, ज्ञानेश्वर जाधव, दिनकर घेवंदे, गौतम वाघमारे, राजू खरात, किरण साळवे, विलास रत्नपारखे, लिंबाजी वाहूळकर, अॅड. कल्पना त्रिभुवन यांच्यासह विविध संघटनांचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बदनापूर येथे रास्ता रोको निषेध मोर्चा बंद शांततेत
मोर्चा, रास्ता रोको करून शांततेत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. बदनापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून या निषेध मोर्चाची सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा पोलीस ठाणे, महाराष्ट्र बँक, बुलडाणा अर्बन, महाराजा हॉटेल, बाजार समिती, ईदगाह, बालाजी कॉम्प्लेक्स, बस स्टँड, डॉ. आंबेडकर पुतळा असा काढण्यात आला. त्यानंतर जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
तहसीलदार प्रवीण पांडे, पोनि रामेश्वर खनाळ यांना महिलांनी निवेदन दिले. यावेळी सतीश साबळे, राहुल तुपे, सनी रगडे, राहुल चाबूकस्वार, दलितमित्र सांडूजी कांबळे, रविराज वाहुळे, बबन गायकवाड, सचिन खरात, संतोष शेळके, राजन मगरे, नरेंद्र साबळे, प्रकाश मगरे, पवन रत्नपारखे, अमोल दाभाडे, संतोष कांबळे, प्रमोद साबळे, योगेश साळवे, सतीश खंडागळे, करण दिवे, प्रदीप सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गरबडे, विवेक दहिवाळ, विलास साबळे, अशोक मगरे, मंजीत मगरे, संतोष साबळे, रवि साबळे, नितीन साबळे, सचिन हिवराळे, हमीद साबळे, पी. के. गरबडे, रवि मगरे, विलास मगरे, सुहास बनसोडे, किशोर बोर्डे आदींंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नेरमध्ये प्रतिसाद
जालना तालुक्यातील नेर येथे महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी २ तास दुकाने बंद ठेवली. बुधवारी येथे आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजाराच्या दिवशी अनेकांची आर्थिक देवाणघेवाण होत असते. सकाळी बाजारासाठी आलेल्या दुकानदारांना बाजार बंद असल्याचे समजल्यावर परत जावे लागले. परिणामी आठवडी बाजाराला आर्थिक फटका बसला. दोन तास शांततेत बंद ठेवून व्यवहार सुरळीत सुरू झाले.
वडीगोद्रीत कडकडीत बंद
सकाळपासूनच वडीगोद्री परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ पूर्णत: बंद होती. खाजगी इंग्रजी शाळांनीही सुटी दिली होती. या बंदमुळे नागरिकांची गैरसोय झाली. जिल्हा परिषद शाळा, दवाखाने, हॉटेल, दुकाने, खाजगी शाळा हे सर्व बंद होते. या बंदमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये.यासाठी पोलीस दलाने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राजूरला कडकडीत बंद
राजूर येथे बुधवारी कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच दोषी समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बाजारपेठ दिवसभर बंद असल्याने परगावाहून आलेल्या नागरिकांचे हाल झाले.
सकाळपासूनच व्यापा-यांनी आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. दिवसभर बाजारपेठ बंद असल्याने परगावाहून आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. हॉटेलसह सर्वच दुकाने बंद असल्याने ग्लासभर पाण्यासाठीही नागरिकांची परवड झाली. महिला व पुरूषांनी बंदचे आवाहन करण्यासाठी रॅली काढली. रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करून या दुर्दैेवी घटनेचा सामूहिक निषेध केला. यावेळी भाऊसाहेब काकडे, बाबूराव मगरे, बबन मगरे, श्रीमंता बोर्डे, संतोष मगरे, कडूबा आठवले, प्रवीण गवळी, अशोक मगरे, भाऊसाहेब कासारे, दीपक सोनवणे, नितीन खरात, मोकींदा मगरे, सुनील साबळे, अनिल साबळे, देवा पंजरकर, काळूबा मगरे, अशोक बोेर्डे, दादाराव मगरे, राहुल नावकर, विजय मगरे आदी सहभागी होते.
शहागडला शांततेत प्रतिसाद
शहागड येथे दलित संघटनांच्या वतीने व व्यापारी बांधवांच्या वतीने शांततेत बंद पाळण्यात आला. पोलीस चौकीत निवेदन देऊन गावातील समाज मंदिरासमोरून निषेध रॅली काढण्यात आली. व्यापा-यांनी शंभर टक्के बंद पाळला. दलित समाज बांधवांच्या निषेध रॅलीत काही मुस्लिम समाज बांधवही सहभागी झाले होते. यावेळी विलास म्हस्के, सुलेमान शाह, अॅड. अतुल कांबळे, भाऊसाहेब जोगदंड, राजेंद्र वारे, अतुल जोगदंड, संतोष येटाळे, सुरेश येटाळे, विठ्ठल शेळके, दीपक जोगदंड, धम्मदीप येटाळे, शाहूराव येटाळे, साईनाथ डोंगरे, बडेभाई बारामती, हनीफ इनामदार आदी सहभागी झाले होते.
आष्टीत सर्वधर्मीयांचा सहभाग
आष्टी : आष्टी व्यापारपेठ, शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद होती. बंदमध्ये मराठा, मुस्लिम, सकल ओबीसी समाजाने सहभाग नोंदवत घटनेचा निषेध नोंदवला.
टेंभुर्णी येथे रॅली
टेंभुर्णी : बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच गावातील सर्व प्रकारची छोटी मोठी दुकाने, सरकारी व खाजगी शैक्षणिक संस्था बंद होत्या. यावेळी गावातून निघालेल्या रॅलीचा समारोप आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. या रॅलीत बौद्ध बांधवांसह गावातील अन्य धर्मीय समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी माजी जि. प. सदस्य किसनराव मघाडे, प्रभू वाघमारे, गौतम म्हस्के, गुड्डू मघाडे, बाळू सावंत, दिनकर ससाने, प्रा. सैलिप्रकाश वाघमारे, दीपक बोराडे, गणपत पैठणे, दीपक शिंदे, किरण कासारे, जगन मघाडे, किशोर कांबळे, बाबूराव मघाडे, शंभू काकडे, खालेद सिद्दीकी आदींची उपस्थिती होती.
काळेगाव येथे बंद
टेंभुर्णी : जाफ्राबाद तालुक्यातील काळेगाव बंद पाळून बौद्ध समाज बांधवांनी रॅली काढली. रॅलीचा समारोप येथील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी भाऊसाहेब शेजवळ, उमेश सुतार आदींची भाषणे झाली. निषेध रॅलीत हरिदास ससाणे, जितेश जाधव, गौतम शेजूळ, योगेश जाधव, दादाराव आघाव, कचरूबा जाधव, आकाश जाधव, जीवन शेजवळ आदींनी सहभाग घेतला.