वडीगोद्री येथील लसीकरण शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:08+5:302021-09-21T04:33:08+5:30
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर शनिवारी घेण्यात आले होते. ...
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर शनिवारी घेण्यात आले होते. या शिबिरात १८ वर्षांवरील २१८ नागरिकांनी लस घेतली.
वडीगोद्री हे गाव कोरोनामुक्त राहण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. १८ वर्षांपुढील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. लस हेच सध्या आपले कवचकुंडल आहे. ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच रत्नप्रभा खटके यांनी केले आहे.
यावेळी सरपंच रत्नप्रभा खटके, उपसरपंच वंदना काळे, पंढरीनाथ खटके, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार गांडगे, डॉ. सुशील जावळे, डॉ. मोराळे, डॉ. जाधव, डॉ. कीर्तिजा तरटे, रेखा राठोड, छाया काकड, व्ही. एस. गायकवाड, ए. आर. पारखे, वाय. बी. बळी, शिक्षक एस. बी. राऊत, एस. पी. बंडगर यांची उपस्थिती होती. लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वाती कोळपकर, चेतना बिबे, विजयमाला चव्हाण, शोभा कुंभकर्ण, अन्नपूर्णा काळे, बाबू राठोड, बाबासाहेब आटोळे, संतोष गावडे, कल्याण धुमाळ, आशुतोष धुमाळ, कल्याण भोसले, कृष्णा घागरे यांनी परिश्रम घेतले.