शिंदेवडगाव, गुरूपिंप्री येथे लसीकरणास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:28 AM2021-09-13T04:28:03+5:302021-09-13T04:28:03+5:30

शिक्षकांचे अनुदान देण्याची मागणी राजूर : जिल्ह्यातील घोषित, अघोषित व मूल्यांकन प्राप्त तुकड्या व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित ...

Response to Vaccination at Shindewadgaon, Gurupimpri | शिंदेवडगाव, गुरूपिंप्री येथे लसीकरणास प्रतिसाद

शिंदेवडगाव, गुरूपिंप्री येथे लसीकरणास प्रतिसाद

Next

शिक्षकांचे अनुदान देण्याची मागणी

राजूर : जिल्ह्यातील घोषित, अघोषित व मूल्यांकन प्राप्त तुकड्या व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आली. भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संजय भातलवंडे, संतोष जोशी, राजेश भिसे, अतुल हेसलकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

उत्कृष्ट अंगणवाडीचा गौरव होणार

जालना : जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत परसबाग निर्मिती करून सुदृढ बालक ही संकल्पना रूजवावी. अंगणवाडी सेविकेने नावीण्यपूर्ण उपक्रम अंगणवाडी स्तरावर राबवावेत, उत्कृष्ट अंगणवाडी केंद्राची निवड करून त्या अंगणवाडीचा गौरव केला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांनी सांगितले. १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण महिन्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन जि.प. अध्यक्ष उत्तम वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती अयोध्या चव्हाण, जयप्रकाश चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेश सोळुंके आदींची उपस्थिती होती.

लघु तलावाचे जलपूजन

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील लघु तलाव शंभर टक्के भरून ओसंडून वाहत आहे. या तलावाचे जि.प. सदस्य अंशीराम कंटुले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आहे. याप्रसंगी संदीप कंटुले, अरूण देवी, रमेश कंटुले, विष्णू शिंदे, दिलीप कंटुले, पांडुरंग कंटुले, जनार्दन बोकण आदींची उपस्थिती होती.

रस्त्यासह नालींचा अभाव : नागरिक त्रस्त

भोकरदन : तालुक्यातील गोंद्री येथे काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने नाली अभावी अनेक नागरिकांच्या घरासमोर ठिकठिकाणी पाणी साचले असून, तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वच्छता मात्र नावाला राहिली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरत आहे. याकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

दाभाडी आरोग्य केंद्रात रिक्त पदे

दाभाडी : बदनापूर तालुक्यातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या दाभाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदे असल्यामुळे रुग्णसेवेत व्यत्यय येत आहे. परिणामी ग्रामीण रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन महागडे उपचार करुन घ्यावे लागत आहे. आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविका, शिपाई ही पदे कित्येक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्र रामभरोसे चालत आहे. सध्या दुषित वातावरणामुळे चोहोबाजूंनी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शासनाचे आरोग्य विभागावर मोठे लक्ष असून, आरोग्य केंद्रासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहे. दरम्यान वातावरण बदलाच्या परिणाम पासून नागरिक त्रस्त आहेत.

जि.प. शाळेतील विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र

जालना : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवळी पोखरी येथील आठवीची विद्यार्थिनी भाग्यश्री कुंडलिक कुसळकर हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे. तिला मुख्याध्यापिका बेबीसरोज हिवाळे, योगेश उबाळे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल भाग्यश्री चे गटशिक्षणाधिकारी भरत वानखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी गीता नाकाडे, केंद्रप्रमुख गंगाधर राजकर, प्रताप बनकर, अंबादास खरात, तुळशीदास माने, योगेश उबाळे, यशवंत बोर्डे, मनीषा कुटे यांच्यासह आदींनी कौतुक केले आहे.

Web Title: Response to Vaccination at Shindewadgaon, Gurupimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.