शिक्षकांवर पिढी घडविण्याची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:58 AM2018-07-30T00:58:27+5:302018-07-30T00:58:45+5:30

विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची मोठी जबाबदारी असते. ही जबादारी शिक्षकांनी प्रमाणिकपणे पार पाडल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल घडू शकते. असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा म्हणाल्या

Responsibility of teachers to develop generation | शिक्षकांवर पिढी घडविण्याची जबाबदारी

शिक्षकांवर पिढी घडविण्याची जबाबदारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची मोठी जबाबदारी असते. ही जबादारी शिक्षकांनी प्रमाणिकपणे पार पाडल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल घडू शकते. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी रामनगर येथे केले. शिक्षकांच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
रामनगर येथील समाजकार्य महाविद्यालयात हडपसावरगाव अंतर्गत येणाऱ्या शाळेतील शिक्षकांसाठी बीटस्तरीय कार्याशाळा आयोजिण्यात आली होती. त्यात २४० शिक्षकांचा सहभाग होता. यावेळी डायटचे प्राचार्य जगराम भाटकर, शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी, रवी जोशी, डॉ. प्रकाश मांटे, विस्तार अधिकारी भारत वानखेडे, बाळासाहेब खरात यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अरोरा म्हणाल्या की, शिक्षकांवर समाज घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. त्या बद्दल त्यांना आता झोकून देऊन काम करावे लागेल. शिक्षण देताना ते विद्यार्थ्यांना मनापासून दिले पाहिजे. केवळ कोणी आपली स्तुती अथवा एखादा पुरस्कार देऊन गौरव करेल ही आशा न ठेवता विद्यादान करण्याचे अरोरा म्हणाल्या. शिक्षकांनी शाळेच्या वेळेत शाळेत राहणे अपेक्षित आहे. असे न झाल्यास आपण केव्हाही शाळेला अचानक भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगून दोषी शिक्षकांची गय केली जाणार नाही, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी वृक्षरोपनाला महत्व देण्याचे सांगून एक मुल एक झाड उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मावकर आणि रमेश हुसे यांनी केले.

Web Title: Responsibility of teachers to develop generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.