पूर्णा नदीपात्रात महसूलने तैनात केले बैठे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:51 AM2020-02-03T00:51:13+5:302020-02-03T00:51:30+5:30

महसूल विभागाने केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात कर्मचाऱ्यांचे बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

Revenue deployed squad in Purna river basin | पूर्णा नदीपात्रात महसूलने तैनात केले बैठे पथक

पूर्णा नदीपात्रात महसूलने तैनात केले बैठे पथक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन / राजूर : जवखेडा ठोंबरे परिसरात अवैध वाळूचा साठा जप्त केल्यानंतर महसूल विभागाने केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात कर्मचाऱ्यांचे बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर वाळू माफियांनी आता हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव तारू शिवारातून वाळूचा उपसा सुरू केला होता. महसूलच्या पथकाने रविवारी तस्करांवर कारवाई करून तीन ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन जप्त केली.
तालुक्यातील अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूल विभागाने अचानक धरपकड मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. १ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड व पथकाने पूर्णा, केळणा नदीच्या परिसरातील अवैध वाळूसाठा पकडला होता. त्यानंतर तहसीलदार संतोष गोरड यांनी सदर साठा करणा-या विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या सातबा-यावर बोजा चढविण्याचा आदेश केला होता.
बैठ्या पथकासोबत नाहीत पोलीस कर्मचारी
तहसीलदार संतोष गोरड यांनी केदारखेडा येथील पूर्णा नदीच्या पात्रात मंडळाधिकारी किरण थारेवाल, तलाठी महेंद्र शेटे, केदारखेड्याचे पोलीस पाटील, कोतवाल शेख उस्मान यांची नियुक्ती केली आहे.
मात्र सदर पथकासोबत पोलीस कर्मचारी दिला नसल्यामुळे या बैठ्या पथकाचा वाळू माफियावर किती परिणाम होईल, हे सांगता येणार नाही़
काहींना कारवाईत सूट?
भोकरदन तालुक्यातील अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूल विभागाने धरपकड मोहीम सुरू केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. मात्र अद्यापही काही वाहने सुरू असल्याने त्यांना या कारवाईतून सूट दिली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Revenue deployed squad in Purna river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.