एसआयटीप्रमुख कृष्णकुमारांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:31 AM2019-02-08T00:31:07+5:302019-02-08T00:31:40+5:30

स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत जवळपास ५५ लाख रूपयांचे बोगस बियाणे पकडले होते. या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीप्रमुख कृष्णकुमार हे जालन्यात आले होते.

Review by SIT Chief Krishnakumar | एसआयटीप्रमुख कृष्णकुमारांकडून आढावा

एसआयटीप्रमुख कृष्णकुमारांकडून आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना ही बियाणांची राजधानी असली तरी येथे यापूर्वी अनेक बोगस बियाणे प्रकरण पुढे आली आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात येथे एका बनावट बियाणे तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश कृषी विभाग (तांत्रिक) आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत जवळपास ५५ लाख रूपयांचे बोगस बियाणे पकडले होते. या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीप्रमुख कृष्णकुमार हे जालन्यात आले होते.
काही महिन्यापूर्वी जालन्यातील कारवाईत संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता, या सर्व बोगस बियाणांचे धागेदोरे हे गुजरातपर्यंत पोहचले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी ही राज्य सरकारने एसआयटीकडे सोपवली होती. त्या एसआयटीचे प्रमुख पोलीस
महानिरीक्षक कृष्णकुमार यांनी आढावा घेतला.
कृष्णकुमार यांनी दुपारी दोन ते अडीच तास जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, कृषी अधीक्षक विजय माईनकर यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी शेळके, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कृष्णकुमार यांनी सांगितले की, बंदी असेले एचटीबीटी बियाणे अर्थात हर्बीसाईड टॉलरंटवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देऊन त्याचे उत्पादन आणि विक्रीवरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश कृष्णकुमार यांनी दिले. त्यांच्या या अचानक दौ-याने बियाणे क्षेत्रात खळबळ उडाली होती.
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात बंदी असलेले आणि कुठल्याच कंपनीचे अधिकृत नसलेले एचएसबीटी बियाणांची जवळपास ६५७ पाकिटे तसेच अन्य बियाणे जप्त केले होते. दरम्यान गौर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केल्याबद्दल पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, समाधान पवार यांनी स्वागत केले.
तणनाशकाचाही परिणाम नाही
हे भारतात बंदी असलेले एचएसबीटी बियाणावर तणनाशकाचाही परिणाम होत नसल्याचे पुढे आले आहे. अत्यंत घातक असलेल्या या बियाणाने जमीनीचा पोत खराब होण्यासह पर्यावरणावरही विपरित परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भविष्यातील परिणांचा विचार करता यावर भारतात बंदी घातली आहे. या कपाशीचे उत्पादन एका अमेरिकन कंपनीने केले होते.
्रयोगशाळेचा सकारात्मक अहवाल
हे बियाणे नागपूर आणि पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असता, तेथून ते बोगस असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर जवळपास पाचही संशयित आरोपीविरूध्द गुन्हे दाखल करून त्यांच्या विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती कृष्णकुमार यांना देण्यात आली. यावेळी त्यांनी या माहितीवर समाधान व्यक्त करून कृषी तसेच पोलीसांनी बंदी घातलेल्या घातक बियाणांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे या संदर्भात सूचना केल्या.

Web Title: Review by SIT Chief Krishnakumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.