दरात तेजी : गुळाचे खाणार त्याला आरोग्य मिळणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:30 AM2021-07-29T04:30:13+5:302021-07-29T04:30:13+5:30
पिवळा, लाल अशा दोन प्रकारांत गुळाच्या भेल्या येथे येतात. आज साखर आणि गुळाचे दर हे जवळपास समसमान झाले ...
पिवळा, लाल अशा दोन प्रकारांत गुळाच्या भेल्या येथे येतात. आज साखर आणि गुळाचे दर हे जवळपास समसमान झाले आहेत. गूळ प्रतिक्विंटल ३३५० ते ३४०० आणि साखरेचे दरही जवळपास असेच आहेत. त्यातच कोरोनानंतर गुळाची मागणी वाढली असून, गुळाच्या चहाला पूर्वी नाकारले जात होते; परंतु त्याच्या मागणीत आता वाढ झाली आहे.
लोहयुक्त पदार्थामुळे मागणी वाढली
गूळ निर्मितीसाठी लोखंडी कढईचा उपयोग होतो. त्यामुळे या लोखंडी कढईतून किंचतसे का होईना लोह गुळात मिसळले जाते. त्यातच अनेकांना साखरेपासून तयार चहामुळे ॲसिडीटीत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन गुळाला मोठी मागणी असून, त्यातही सेंद्रिय गुळाची मागणी ही सामान्य गुळाच्या तुलनेत वाढली असल्याची माहिती येथील गूळ बाजाराचे सरचिटणीस गोविंद सराटे यांनी सांगितली.