रस्त्यावर अतिक्रमण : पोलिसांची कारवाई पान- ४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:10+5:302021-09-12T04:34:10+5:30
मोकाट कुत्र्यांमुळे वाहनधारक त्रस्त जालना : तालुक्यातील रामनगर येथे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन ...
मोकाट कुत्र्यांमुळे वाहनधारक त्रस्त
जालना : तालुक्यातील रामनगर येथे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावर नेहमीच मोकाट कुत्र्यांची वर्दळ असते. रस्त्याच्या मधोमध टोळके फिरत असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते. अनेक दुचाकी स्वाराच्यामध्ये कुत्रे आडवे आल्याने जखमी झाल्याच्या घटना घडत आहे.
पठाण यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार
जाफराबाद : तालुक्यातील उपक्रमशील ग्रामसेवक सी. आय. पठाण यांना नुकतीच ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. बेलोरा -धोंडखेडा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कर्तव्य बजावताना कोरोना प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना केल्या. ग्रामविकास अधिकारी पदोन्नती झाल्याने पठाण यांचा टेंभुर्णी ग्रामपंचायतीत सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष सुखदेव शेळके, सरपंच गौतम म्हस्के, राजेश म्हस्के, गणेश धनवई, राम गुरव, अब्दुल अजीस आदींची उपस्थिती होती.
नियमांचे पालन करत गणेशाची स्थापना
भोकरदन : शहरात कोरोनाचे प्रतिबंध, नियम- अटींचे पालन करीत गणेशाचे आगमन झाले. अधिकृत परवाना घेतलेल्या मंडळांपैकी नवतरुण गणेश मंडळ पेशवे नगरच्या श्रीगणपती मूर्तीचे दुपारी साडेबारा वाजता विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शुक्रवारी गणेश चतुर्थीला मुहूर्त साधत घरोघर गणेश स्थापना करण्यात आली. सकाळपासूनच रत्नाकर तांदुळजे, राम कुळकर्णी, सुरेश पुराणिक, श्रीपाद झाल्टे, अभय शास्त्री, श्रीपाद शास्त्री आदी ब्रम्हवृंदानी आपल्या यजमानाच्या घरी जाऊन विधिवत पूजा सांगून श्रीं ची प्रतिष्ठापना केली.
फत्तेपूर येथे माजी सैनिकाचा सत्कार
भोकरदन : सव्वीस वर्षे देशसेवा करून निवृत्त झालेले फत्तेपूर येथील उत्तम सांडू गायकवाड यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष महाराज आढवणे, नाथा मव्हरे, रमेश बरडे, आसाराम गायकवाड, सुरेश वनारसे, रामदास गायकवाड, शंकर गायकवाड, दीपक बरडे, आण्णा गायकवाड, दिलीप बरडे, उत्तम गायकवाड, गणपत बरडे, पांडू बरडे, नितीन वणारसे, दिनकर बरडे आदी उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी आपल्या सेवेतील काही अनुभव कथन केले.
विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड
भोकरदन : शासनाच्या विविध योजनांचे शेतकऱ्यांना अनुदान जलद गतीने मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य ड्रीप डिलर असोसिएशनची बैठक औरंगाबाद येथे होऊन त्यात शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ड्रीप डिलर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी विश्वास पाटील, कार्याध्यक्ष आव्हाण्याचे विनोद गावंडे, सचिवपदी पांडुरंग शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित कार्यकारिणीत सहसचिव भास्कर जाधव, कोषाध्यक्ष महेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रमोद बायस्कर, गुणवंत ठोकळ, विवेक भामरे, सुदाम खोसरे, शैलेश लंबे, सदस्य गणेश पाटील, सोपान पाटील, शिवाजी वायाळ, संजीव माने यांचा समावेश करण्यात आला आहे.