वेड्याबाभळीत हरवला कुरण रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:02 AM2018-11-06T00:02:06+5:302018-11-06T00:02:26+5:30
अंबड तालुक्यातील वाळकेश्वर ते कुरण या चार कि.मी. रस्त्यावर जागोजागी वेड्याबाभळीच्या विळख्यात रस्ता हरवला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर ते कुरण या चार कि.मी. रस्त्यावर जागोजागी वेड्याबाभळीच्या विळख्यात रस्ता हरवला आहे. विशेष करून वळण रस्ता दिसत नसल्याने दिवसेदिवस अपघात वाढले आहेत.
वाळकेश्वर ते कुरण चार किमीचा रस्त्यावर सात ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणावर मोठ्या प्रमाात बाभळीच्या फाद्या रस्त्यावर आल्या आहे. यामुळे समोर येणारे वाहने दिसत नाही. यामुळे गेल्या काही दिवसात आठ दुचाकीचे अपघात झाले आहे. अनेकजण जायंबदी झाले आहेत. वाळकेश्वर येथून कुरण कडे जाणाऱ्या मागावरील जि.प. शाळा वळण बाभळीमुळे धोकादायक बनला आहे. याबाबत वाहनधारकांनी तक्रारी करुनही सार्वजनिक बाधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वाहनधारकात संताप आहे. रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी, वाढलेल्या झाडाच्या फाद्या तोडण्याचे काम मैलकुलीकडून होणे अपेक्षीत आहे. मात्र याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने संपूर्ण चार कि़मी. रस्ता वेड्याबाभळीच्या विळख्यात वेढला गेला आहे. कुरण, कुरण नुतन वसाहत च्या माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थींनी सायकल वरून ये-जा करतात. त्यामुळे वळण रस्त्यावरील वेड्याबाभळीमुळे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. तर संबंधित विभागाने वाळकेश्वर -कुरण रस्त्यावरील अपघातास निमंत्रण देणाºया वेड्याबाभळी तोडण्यात याव्या अशी मागणी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली आहे. यासह परिसरातील इतर रस्त्याची दुरुवस्था असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी बाभळी वाढल्या आहेत. याकडे सार्वजननिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.