रुंदीकरण : वृक्षांच्या मुळावर घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:48 AM2018-11-21T00:48:48+5:302018-11-21T00:49:10+5:30
जालना ते अकोला या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही दिवसात सुरू करण्यात येणार आहे. पण, या रस्त्याचे रूंदीकरण आता वृक्षांच्या मुळावर उठले आहे.
जालना : जालना ते अकोला या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही दिवसात सुरू करण्यात येणार आहे. पण, या रस्त्याचे रूंदीकरण आता वृक्षांच्या मुळावर उठले आहे. एकीकडे जुनाट वृक्षांची संख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने कमी होत चालली आहे. यामुळे वृक्ष पे्रमींमधून संताप व्यक्त केला जात असताना आता या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या आड येत असलेली जुनाट लिंब, गोड बाभूळ यासह अनेक वृक्ष तोडले जात आहेत.
येत्या काही दिवसात जालना बायपास, चिखली, देऊळगाव राजा ते अकोला या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. यामुळे रुंदीकरणात अडथळा निर्माण करणारी जालना जिल्ह्याच्या हद्दीतील ११० ते १२० जने वृक्ष तोडण्यात येत आहेत. यात गोड बाभूळ, लिंब यासह अनेक वृक्षांचा समावेश आहे. या वृक्ष तोडीच्या बदल्यात पाच हजार वृक्षांची विविध ठिकाणी लागवड करून घेतली जाणार असल्याचे उप वन संरक्षक श्रीकांत इटलोड यांनी लोकमतशी बोलताना दिली.