जालना शहरातील रस्ते आता एलईडीच्या दिव्यांनी उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:48 AM2018-12-16T00:48:20+5:302018-12-16T00:49:00+5:30
उन्नत ज्योती अफोर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला योजना )ही योजना केंद्र आणि राज्य शासन ाच्या ऊर्जा विभागाकडून राबविण्यात येत असून, ही योजना एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिस अंतर्गत ३० एप्रिल २०१६ पासून लागू केलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उन्नत ज्योती अफोर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला योजना )ही योजना केंद्र आणि राज्य शासन ाच्या ऊर्जा विभागाकडून राबविण्यात येत असून, ही योजना एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिस अंतर्गत ३० एप्रिल २०१६ पासून लागू केलेली आहे.
मात्र या योजनेची प्रगती व प्रसिद्धी कमी असल्यामुळे या योजने अंतर्गत विजेची बचत होण्याच्या दृष्टीने जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात एलईडी लाईट बसविण्या संदर्भात पालकमंत्री लोणीकर यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, महावितरण चे अधीक्षक अभियंता कैलास हुमणे , कार्यकारी अभियंता देवकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कार्यकारी अभियंता अजय सिंग, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार सुमन मोरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोकणी यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुखांची उपस्थिती होती. जालना , परतूर , भोकरदन ,अंबड नगर परिषद कार्यालय , मंठा ,जाफराबाद, बदनापूर ,घनसावंगी नगर पंचायत कार्यालय तसेच जिल्ह्यातील इतर सर्व सर्व शासकीय कार्यालयात प्राधान्याने एलईडी दिवे बसविण्याच्या सूचना लोणीकर यांनी नोडल अधिकारी कैलास चव्हाण यांना दिले .
जालना शहरासंदर्भात माहिती देताना नोडल अधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, पूर्वी नोडल एजन्सीने जालना नगर परिषदेसासेबत २०१६ मध्ये करारनामा करून, उजाला योजने अंतर्गत शहरातील सर्व पथदिवे बदलून एलइडी लाईट बसविण्यास सुरवात करून २०० एलईडी बसविण्यात आले होते . मात्र २०१६ ला महावितरणचे नगर परिषदकडे ११ कोटी रूपयांची विद्युत बिल थकले होते. त्या मुळे शहरातील पथदिव्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. त्यामुळे शहरात पथदिव्यास विद्युत कनेक्शन नसल्यामुळे उर्वरित एलईडी बसविण्याची प्रक्रिया बंद केली होती.
मात्र, जालना नगर परिषद , शहरातील नागरिकांनी पथदिवे सुरु करण्या संदर्भात अनेक निवेदने दिली होती. त्या नुसार पालकमंत्री लोणीकर यांनी हे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी ,नगर परिषद जालना , महावितरण जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात जालना नगर परिषदेकडे असलेल्या वीज बिलासंदर्भात संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. संयुक्त सर्वेक्षणा नुसार सुधारीत देयक भरण्याचे ठरले होते. त्या पैकी सुधारित बिलातील (११ कोटी ऐवजी ८ कोटी ५२ लक्ष) मूळ मुद्दल भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत ४ कोटी १२ लक्ष इतका निधीही उपलब्ध करून महावितरणकडे २७ मार्चला भरणा करण्यात आला होता. त्यानुसार जालना शहरात जवळपास सहा हजार एलईडी पथदिवे बसण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती संबंधित एजंसीने दिली.
जालना शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजवुरवठा अचानक ंखंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. याचे कारणही या बैठकीत चर्चेला आले. त्यावैही काही ठिकाणी वीजेचे साहित्य नसल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची नागरिकांच्या तक्रारी आहेत. असे सांगण्यात आले. त्यावेळी अधीक्षक अभियंता यांनी खुलासा करतांना सांगितले की, सध्या साहित्य तसेच डीपी आॅईलची कमतरता होती. ती आता दूर करण्यात आली आहे. उरण येथून १० केएल. एवढे आॅईल आणले असून, त्यातून डीपी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा गौण राणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रूपयांचे वीजबिल थकले असल्याचे हुमणे म्हणाले.