व्यापाऱ्याला लुटणारे लुटारू सहा तासांत गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:10 AM2018-06-01T01:10:09+5:302018-06-01T01:10:09+5:30

वडीगोद्री ते शहागड मार्गावरील एका ढाब्याजवळ व्यापा-यांना चाकूचा धाक दाखून २० हजार रुपये आणि मोबाईल लंपास करणाºया चोरट्यांना पोलीसांनी घटनेनंतर अवघ्या सहा तासात जेरबंद केले.

Robbers arrested within six hours | व्यापाऱ्याला लुटणारे लुटारू सहा तासांत गजाआड

व्यापाऱ्याला लुटणारे लुटारू सहा तासांत गजाआड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वडीगोद्री ते शहागड मार्गावरील एका ढाब्याजवळ व्यापा-यांना चाकूचा धाक दाखून २० हजार रुपये आणि मोबाईल लंपास करणाºया चोरट्यांना पोलीसांनी घटनेनंतर अवघ्या सहा तासात जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी पहाटे यशस्वी करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेद्रसिंह गौर यांनी दिली.
हरिदास रघुनाथ दावडे आणि त्यांचे सहकारी विनोद हसोळ हे परळी येथील बाधकामांसाठी वापरण्यात येणा-या विटाचा व्यवसाय करतात. ते विटा घेऊन गेवराई येथे आले होते. विटा पोहोचत्या केल्यावर रात्री ते दोघे जण वडीगोद्री ते शहगड दरम्यान असलेल्या एका ढाब्याजवळ मुक्कामास थांबले होते. बुधवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ते पुन्हा ट्रक घेऊन परळीकडे निघाले असतांना त्यांच्या ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड नेमका काय आहे हे पाहण्यासाठी ते ट्रकच्या खाली उतरले असतांना दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून २० हजार ४३० रुपये रोख आणि मोबाईल लुटून नेला. या प्रकरणाची माहिती व्यापा-यांनी तातडीने गोंदी पोलीस ठाण्यात कळवली. ही माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गौर यांना कळवली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन व्यापा-यांकडून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याचे वर्णन जाणून घेऊन लगेचच त्यांच्या खब-यांना ही माहिती पुरवली. खब-यांकडून माहिती मिळताच त्यांनी पाचोड येथे आपल्या सहका-यासह धाव घेतली. यावेळी रोहण साहेबराव आहेर, आश्रफ फिरोज पठाण, सलीम सय्यद अब्बास आणि अक्षय उर्फ भु-या, भगवान दौड या चार तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. यावेळी लगेचच या चार जणांनी व्यापा-याला लुटल्याची कबुली दिली. या आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम व मोबाईल जप्त केल्याचे गौर यांनी संगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परजणे, स्थानिक गुन्हे शाखेच्या उप निरीक्षक हनुमंत वारे, अमित सिरसाठ, कैलास कुरेवाड, आदींचा समावेश होता.

Web Title: Robbers arrested within six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.