औद्योगिक वसाहतीतील हवाला प्रकरणाची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:08 AM2018-11-12T01:08:01+5:302018-11-12T01:08:38+5:30

स्टील उद्योजक आणि स्टील ब्रोकरमध्ये हवाला प्रकरणातील पैशावरून जो वाद होऊन सतीश राठी यांना जी मारहाण झाली, त्या प्रकरणात आता पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Robbery in industrial area will be investigated | औद्योगिक वसाहतीतील हवाला प्रकरणाची होणार चौकशी

औद्योगिक वसाहतीतील हवाला प्रकरणाची होणार चौकशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या आठवड्यात स्टील उद्योजक आणि स्टील ब्रोकरमध्ये हवाला प्रकरणातील पैशावरून जो वाद होऊन सतीश राठी यांना जी मारहाण झाली, त्या प्रकरणात आता पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
येथील गजकेसरी स्टीलमध्ये सतीश राठी यांना जबर मारहाण करण्यात आली. यावेळी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या समक्ष ही घटना घडल्याने त्याला वेगळे वळण मिळाले आहे. एकूणच या प्रकरणात माहेश्वरी समाजाने संतप्त भूमिका घेऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालन्यातील स्टील उद्योजकाचे राठी यांना जवळपास ७० लाख रूपयांपेक्षा जास्तीचे पैसे देणे बाकी होते असे समजते. परंतु यात तथ्य नसल्याचे राठी यांचे म्हणणे आहे. एकूणच हा सर्व व्यवहार हवालाचा असल्याने हे पैसे कोणाकडून आणि कोणत्या व्यवहाराचे होते, तसेच त्या व्यवहाराचे पक्के बिल होते काय, याचीही चौकशी पोलीस करणार आहेत. दरम्यान यापूर्वीही जालना रेल्वे स्थानकावर जी २७ लाख रूपयांची बॅग चोरीला गेली होती. त्या प्रकरणातही अद्यापही मूळ मालक ना रेल्वे पोलीस ना जालना पोलीसांकडे हजर झाला नाही. त्यामुळे ते २७ लाख रूपये देखील हवालातील आहेत की, काय अशी श्ंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: Robbery in industrial area will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.