चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:51 AM2018-09-06T00:51:16+5:302018-09-06T00:51:42+5:30

परतूर तालुक्यातील आष्टी येथील पाटील गल्लीतील केशव थोरात यांच्या घरातून महिलेच्या अंगावरील दागिन्यासह रोख ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

By robbing a knife, the thieves looted five lakhs of rupees | चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लुटला

चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लुटला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील पाटील गल्लीतील केशव थोरात यांच्या घरातून महिलेच्या अंगावरील दागिन्यासह रोख ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
थोरात कुटुंबीय सकाळच्या साखर झोपेत असतांना चार चोरट्यांनी घराच्या पाठीमागच्या बाजूने घरात प्रवेश केला. केशव थोरात यांच्या पत्नी स्वाती सकाळी पाणी तापवण्यासाठी उठल्याने त्यांना घरात चोरटे शिरल्याची चाहूल लागली. त्यांनी तातडीने याची माहिती पती केशव थोरात यांनी दिली. थोरात यांनी घरातील इतर दरवाजे बंद करण्याच्या आधीच चोरटे आत शिरले आणि चाकूचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद श्रीकांत केशव थोरात यांनी पोलीस ठाण्यात दिली.
या तक्रारत म्हटले आहे की, पत्नी स्वाती या हिटर सुरू करण्यासाठी उठल्या असता त्यांना घराच्या चौकात एक चोरटा उभा दिसला त्यांनी ताबडतोब आरडाओरड केल्याने पती केशव व अन्य सदस्य जागे झाले. परंतु तो पर्यंत चार ते पाच चोरटे घरात शिरले होते. त्या चोरट्यांनी बैठकीचा दरवाजा बंद करून चाकूसह अन्य शस्त्राचा धाक दाखवून दागिने काढून घेतले.
एकूण चार जणांनी घरातील कपाटातील सोने व महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवून हिसकावून समोरच्या दरातून पोबराा केला.
याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी उपविभागिय अधिकारी संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे यशवंत जाधव यांनी भेटी दिल्या. श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

Web Title: By robbing a knife, the thieves looted five lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.