सोयाबीनवर फिरविला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:59 AM2019-08-28T00:59:01+5:302019-08-28T00:59:16+5:30
पावसाअभावी पारडगाव परिसरातील पिके धोक्यात आली आहेत. तर पारडगाव येथील एका शेतकऱ्याने दोन एकरावरील सोयाबीनवर चक्क नांगर फिरविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारडगाव : पावसाअभावी पारडगाव परिसरातील पिके धोक्यात आली आहेत. तर पारडगाव येथील एका शेतकऱ्याने दोन एकरावरील सोयाबीनवर चक्क नांगर फिरविला आहे.
पावसाअभावी खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, कापूस इ. पिके माना टाकू लागली आहेत. सोयाबीनचे होणारे नुकसान पाहता येथील शेतकरी गजानन ढेरे यांनी आपल्या दोन एकरांवरील सोयाबीनच्या पिकात औतानी पाळी घातली आहे. रबी हंगामात तरी पीक हाती येईल, या आशेवर या शेतक-याने शेतीची मशागत सुरू केली आहे. तर हाताला आलेली पिके वाया जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकात जनावरे सोडून दिली आहेत. दरम्यान, या भागातील पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे.
त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने जातीने लक्ष देऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी, सर्वसामान्यांमधून होत आहे.