शिवरात्री निमित्त दर्शनासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:24 AM2019-03-05T01:24:27+5:302019-03-05T01:24:31+5:30

हर..हर.. महादेव..सांभ सदाशिव, जय भालेच्या गजरात सोमवारी महाशिवरात्र जिल्ह्यात उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.

Rush for Darshan for the occasion of Shivratri | शिवरात्री निमित्त दर्शनासाठी रांगा

शिवरात्री निमित्त दर्शनासाठी रांगा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हर..हर.. महादेव..सांभ सदाशिव, जय भालेच्या गजरात सोमवारी महाशिवरात्र जिल्ह्यात उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. विविध महादेव मंदिरात भागवत कथा तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जालन्यातील पंचमुखी महादेव मंदिरात पहाटे चार वाजता महादेवाच्या पिंडीस रूद्राभिषेक करण्यात आला.
जिल्ह्यातील विविध प्राचीन मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त पूजा-अर्चा तसेच महा अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच महिला व पुरूष भाविकांनी दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी केली होती. जालन्यातील पाणीवेस भागातील पंचमुखी महादेव मंदिरात तर रात्री बारावाजेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला होता. सकाळी महादेवाच्या पिंडीस अभिषेक करण्यासाठी देखील भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील अमृतेश्वर, ढवळेश्वर, कुरवंदेश्वर, कोळेश्वरांचा पंचमुखी महादेव मंदिर, कसबा, मुक्तेश्वर, जागृतेश्वर महादेव मंदिरातही भाविकांची गर्दी होती.
जुन्या जालन्यातील इतवारा मोहल्लयातील पंचमुखी महादेव मंदिरात गेल्या आठ दिवसांपासून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता मंगळवारी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. एकूणच पंचमुखी महादेव मंदिरात शिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. यावर्षी दुष्काळाचा परिणाम या यात्रेवर तीव्रपणे दिसून आला. शिवरात्री निमित्त महादेवस आवडणारे कौठांची जोरात विक्री झाली.

Web Title: Rush for Darshan for the occasion of Shivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.