दर कमी करणाऱ्यांकडे ग्रामस्थांची दाढी-कटिंगसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:06 AM2018-03-27T01:06:42+5:302018-03-27T01:06:42+5:30
जळगाव सपकाळ येथे ग्रापंचायतने कमी दरात दाढी-कटिंग करणाºया दोन होतकरू तरुणांना सलून दुकान थाटून दिल्यानंतर सोमवारी याठिकाणी ग्रामस्थांची झुंबड उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन/ जळगाव सपकाळ : तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे ग्रापंचायतने कमी दरात दाढी-कटिंग करणाºया दोन होतकरू तरुणांना सलून दुकान थाटून दिल्यानंतर सोमवारी याठिकाणी ग्रामस्थांची झुंबड उडाली.
जळगाव सपकाळ येथे सुलनची ९ दुकाने आहेत. पैकी ७ दुकाने हे ग्रापंचायतीच्या जागेवर असून, त्यांच्याकडून कुठलेही भाडे घेतले जात नाही. सलून चालक पूर्वी दाढी-कटिंगसाठी ३० रुपये घ्यायचे, मात्र काही दिवसांपासून हे दर ४० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. यास ग्रामस्थांनी विरोध केला. प्रकरण गावात ग्रामसभा घेण्यापर्यंत गेले. नागरिकांनी सलून चालकांना दर कमी करण्याची विनंती केली. मात्र, दर कमी करणार नाही, अशी भूमिका सलून चालकांनी घेतली. त्यामुळे ग्रामस्थांनी या सलून दुकानांवर कटिंग न करण्याचा निर्णय घेतला. गावातीलच नाभिक समाजातील तरुण गजानन वरपे व विठ्ठल वरपे यांना सलून दुकान थाटून दिले. ग्रामस्थांनी दोघांच्या दुकानासमोर रांगा लावून दाढी-कटिंग करून घेतली. सलून चालकांना यापूर्वी भाडे आकारण्यात आले नव्हते. आता ग्रामपंचायत भाडे आकारणार असून, तशा नोटिसा देणार असल्याचे सरपंच मधुकर सपकाळ यांनी सांगितले.