सागर बदर खून प्रकरण : आरोपीने सतत जागा बदली, शेवटी खुलताबादेतून पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 01:32 PM2021-08-07T13:32:56+5:302021-08-07T13:33:49+5:30
खुलताबाद येथून सुध्दा दुसरीकडे जाण्याच्या तयारीत होता.
भोकरदन ( जालना ) : सागर बदर खून प्रकरणातील आरोपीला भोकरदन पोलिसांनी आज ( दि. 7 ) दुपारी 12 वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे अटक केली आहे. योगेश फुके असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांचे पथक भोकरदनकडे घेऊन जात आहे.
5 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान भोकरदन शहरातील 132 केव्ही केंद्राजवळ कैलास फुके व योगेश फुके यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सागर भारत बदर याच्या पोटात योगेश फुके याने चाकू खुपसून खून केला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलशिग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, पोलिस कर्मचारी गणेश पायघन, रुस्तुम जैवळ, सागर देवकर हे दोन दिवसांपासून मागावर होते.
आरोपी सातत्याने जागा बदलत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण जात होते. मात्र, शेवटी शनिवारी सकाळी तो खुलताबाद येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने मुख्य रोडवर झडप मारून योगेशला पकडले. खुलताबाद येथून सुध्दा दुसरीकडे जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला भोकरदन पोलिस ठाण्यात घेऊन येत आहेत.
जुने वाद मिटवून टाकू म्हणून बोलावून घेतलेhttps://t.co/ceEicDsWEO
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 6, 2021