साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:30 AM2021-01-20T04:30:49+5:302021-01-20T04:30:49+5:30
यावेळी प्रा.डॉ. बी.जी. श्रीरामे व अॅड. भारती रोकडे यांना सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेकडून सन्मानपत्र, ...
यावेळी प्रा.डॉ. बी.जी. श्रीरामे व अॅड. भारती रोकडे यांना सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेकडून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पहार देऊन प्रमुख पाहुणे राम गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. बी.जी. श्रीरामे यांनी सत्काराला उत्तर देत असताना शेवटी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा यांच्या जीवनावरची ‘पेरणी’ नावाची एक कविता व महामानवांच्या जीवनावरची ‘गाणं भिमाचं’ नावाची एक कविता अशा दोन कविता त्यांनी सादर केल्या.
यावेळी राम गायकवाड म्हणाले की, गंगाधर पानतावणे यांच्या निधनानंतर राज्यातील परिवर्तनवादी साहित्यिकांना एक अस्मितेचे विचारपीठ राहिले नाही, ती उणीव लक्षात घेऊनच आम्ही जाणीव अस्मितेची साहित्य परिषद आपल्या राज्यात स्थापन केली आहे. या साहित्य परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय साहित्य संमेलने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शहरात भरवली जाणार आहेत. नव्या व जुन्या परिवर्तनवादी सर्व जाती-धर्मातील साहित्यिकांना हक्काचे हे बॅनर झाल्याने प्रत्येक जिल्ह्यात शाखा होत आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी लेखक डॉ. जानराव, कवी डी.के. शेख, पंडित कांबळे, प्रा. शिवाजी गायकवाड, जयराज खुणे, रवींद्र शिंदे, लेखक तात्यासाहेब माने, प्रा. महेंद्र चंदनशिवे आदी साहित्यिक उपस्थित होते.