जालन्यातील संगीत मैफिलीत सखी झाल्या धुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:01 AM2018-03-23T01:01:33+5:302018-03-23T11:35:09+5:30
आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी,व्यवसाय यात तीचा दिवस कसा सरतो तीचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी, मराठी नववर्ष अर्थात पाडवा साजरा केल्यानंतर भारतीय कलेचे अविभाज्य अंग असलेल्या संगीताच्या कार्यक्रमाचा तीला आस्वाद घेता यावा या उद्देशाने लोकमत सखी मंच व कलर्स वाहिनी यांच्यावतीने सदस्यांसाठी सखींसाठी बेपनाह सुरांची मैफिल कार्यक्रम बुधवारी मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी,व्यवसाय यात तीचा दिवस कसा सरतो तीचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी, मराठी नववर्ष अर्थात पाडवा साजरा केल्यानंतर भारतीय कलेचे अविभाज्य अंग असलेल्या संगीताच्या कार्यक्रमाचा तीला आस्वाद घेता यावा या उद्देशाने लोकमत सखी मंच व कलर्स वाहिनी यांच्यावतीने सदस्यांसाठी सखींसाठी बेपनाह सुरांची मैफिल कार्यक्रम बुधवारी मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात पार पडला.
लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, संगीता बोंद्रे, निकीता राज बोंद्रे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
सुरुवातीस गायक मुन्वर खान यांनी ‘तारीफ तेरी निकली है दिलसे’ या साई गीताने केली. यानंतर सविता पाटील यांनी ‘ओ मेरे सोना रे सोना’ सैराट चित्रपटातील ‘सैराट झालं जी , ही चाल तुरु तुरु, मेरे रशके कवल, घुमर घुमर तसेच अशा जुन्या हिंदी, मराठी गाण्यांचा नजराणा सखींसमोर सादर केला.
सखी व त्यांच्या परिवारांनी सर्व गीतांना दाद दिली. कार्यक्रमात सखींसाठी गेम शो घेण्यात आले व बक्षिसेही देण्यात आली. स्वरदीपचे निर्माता व मुख्य गायक दीपक गिरी, शुभम गोसावी, सविता पाटील, प्रज्ञा पाटील यांनी सादर केलेल्या जुन्या हिंदी, मराठी गाण्यांना सखींची उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी सिंथेसाइजर रवींद्र प्रधान, अॅक्टोपॅड सुशील दांडगे, ढोलकी वादक सागर जोशी यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कोरडे यांनी केले. कार्यक्रमास सखींची उपस्थिती होती.
‘बेपनाह’ ही कथा प्रेम आणि विश्वासघात यावर आधारित आहे. ज्यात ज़ोया आणि आदित्य या दोघांचे आयुष्य एका घटनेने पूर्णत: बदलून जाते. यात एका रात्री ज़ोयाचा पती आणि आदित्यच्या पत्नीचा एका कार अपघातात मृत्यू होतो. अपघाताच्या वेळी दोघेही एकत्र असल्याचे समजल्यानंतर ज़ोया आणि आदित्यच्या दु:खाची जागा विश्वासघात आणि द्वेषाने घेतली जाते.
आपल्या पतीने विश्वासघात केला, हे मानण्यास ज़ोया तयार नव्हती. आदित्यने त्याच्या पत्नीला विश्वासघातकी मानून तिच्याशी जुळलेल्या प्रत्येक गोष्टीचा द्वेष करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे जोया आणि आदित्य एकत्र येतात आणि यापुढे काय घडते, हे जाणून घेण्यासाठी पहा ‘बेपनाह - एक हादसा दो अजनबी’, ज़ोया आणि आदित्यची कहाणी १९ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त कलर्सवर.
वन मिनिट गेम शो विजेत्या
-सविता बनकर (बलून स्पर्धा), नीता टेकाळे, अंजली शर्मा, नविता दीक्षित, नंदा गायकवाड, ज्योती मोघडे, डॉ. राधा क्षीरसागर, अनुराधा शिंदे, ज्योती भिसे यांनी डान्स स्पर्धेत यश मिळविले तर प्रियंका शेडूते यांनी उखाणा स्पर्धेत यश मिळविले आहे.