आनंदनगरीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत सखींची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:45 AM2018-03-20T00:45:01+5:302018-03-20T10:52:49+5:30
लोकमत सखी मंच अंबड विभागाने आयोजित केलेल्या आनंदनगरीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत सखींनी एकच धमाल उडवूनन दिली. शनिवारी सांयकाळी शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या आनंदनगरीत विविध पाक कलाकृतींच्या घमघमाटासोबतच बच्चे कंपनीसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडाप्रकारांमुळे नाविन्यपूर्ण रंगत आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : लोकमत सखी मंच अंबड विभागाने आयोजित केलेल्या आनंदनगरीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत सखींनी एकच धमाल उडवून दिली. शनिवारी सांयकाळी शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या आनंदनगरीत विविध पाक कलाकृतींच्या घमघमाटासोबतच बच्चे कंपनीसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडाप्रकारांमुळे नाविन्यपूर्ण रंगत आली.
शनिवारी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास लोकमत सखी मंच आनंदनगरीस प्रारंभ झाला. यावेळी धनश्री जेथलिया व मनीषा जेथलिया यांनी स्वादिष्ट पापडी चाट, प्रणिता गिल्डा यांनी मथुरा लस्सी, रीना बाकलीवाल व जया काला यांनी आईस्क्रीम-कटोरी चाट अशा विविध स्वादिष्ट कलाकृतींचे स्टॉल लावले होते. दर्शना कासलीवाल व सोनल सोमाणी यांनी सादर केलेल्या ब्लॅक फॉरेस्ट व स्पंजी केकचा गोडवा सखींना अनुभवता आला. वर्षा जेथलिया यांनी बच्चे कंपनीसाठी विविध गेम्सचा स्टॉल आयोजित केला होता, याठिकाणी बच्चे कंपनीने धमाल केली. प्रियंका खरात व शीतल खरात यांनी चायनिज पदार्थांचा आस्वाद सखींना दिला. संगीता नाझरकर यांनी वडा सांबार तर रचना रहाटगावकर यांनी आप्पे तर आहिरे यांनी इडली-सांबार या पदार्थांचे स्टॉल लावून सखींना साऊथ इंडियन पदार्थांचा स्वाद दिला. चाट पदार्थांमध्ये सुरेखा घायाळ यांनी कचोरी, जयश्री देशपांडे यांनी रगडा, प्रीती कुलकर्णी यांनी कचोरी या चमचमीत पदार्थांचे स्टॉल लावले होते. स्वीटमध्ये अर्चना पांडे यांनी आईस केक, मयुरी खरात यांनी चंपाकली पदार्थांचे स्टॉल लावून सखींमध्ये गोडवा निर्माण केला. मीरा गायकवाड यांनी गरमागरम सोयाबीन कंटक्कीचा सखींना स्वाद दिला. पुनम गिल्डा यांनी पुलाव, सीमा वाव्हुळे यांनी पकोडे तर अश्विनी पाटील यांनी पुड्याची वडी या पदार्थांची आगळीवेगळी चव सखींना दिली. यावेळी दर्शना कासलीवाल व सोनल सोमाणी यांनी केक साठी प्रथम क्रमांक, संगीता नाझरकर यांनी वडा सांबर साठी व्दितीय क्रमांक, धनश्री जेथलिया यांना पापडी चाट साठी तृतीय क्रमांक तर प्रियंका खरात यांनी व्हेज मंचुरियन साठी उत्तेजनार्थ क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.
यावेळी सखी मंचच्या जयश्री गात, साधना भोईटे, सविता स्वामी, प्रीती शर्मा, दीपाली संगेवार, शिवकन्या कोरे, इंदू पाटील, जया काला, सरिता काला, सरोज सोनवणे, संगीता लाहोटी, नीलम मदान, मीनल मदान, अर्चना राठी, टीना राठी, आरती चांदीवाल, स्वाती गायकवाड, विमल गगराणी, शीतल टकले, सुवर्णा मते, प्रणिता सावजी, पायल राठोड, सुषमा भाला, शीतल काळे, जयश्री काळे, उषा चाळक, प्रतिभा सुलाने, वैशाली राठी, अंजली पाटील, प्रियंका मुंडे, सरोज खंडेलवाल, भारती शर्मा, शर्मिला अगरवाल, अश्विनी गिल्डा, शीतल दरक, सुषमा भाला, जयश्री सोडाणी, अनिता मंत्री, नितीशा सोमाणी, राधिका सोमाणी, सीमा राठी, मनीषा जेथलिया, रीटा राठी, अनिता मुंदडा, कीर्ती लाहोटी, अनुराधा लाहोटी, वीणा जोशी, लीना जोशी, दुर्गा जोशी, जया सोडाणी, वंदना चांदीवाल, हेमा लाहोटी, सरिता लाहोटी, श्रुती लाहोटी, मनीषा बाहेती, वंदना चांदीवाल, मंगल लाहोटी, मनीषा मालपाणी, पूनम लाहोटी, भारती सोनी, जशोदा बियाणी, उमा लाहोटी, सुरेखा मुंदडा, उज्ज्वला लोहिया, मनीषा लोहिया, सुषमा महाजन, आशू धूत, मालती लड्डा आदींसह मोठ्या संख्येने सखींची उपस्थिती होती.