वाहेगावची शिवकन्या झाली विक्रीकर अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:54 AM2019-01-29T00:54:32+5:302019-01-29T00:54:54+5:30

वाहेगाव सातारा येथील शिवकन्या विश्वनाथ पाईकराव हिची विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली आहे

Sales tax officer of Vahegaon became a Shivnikanta | वाहेगावची शिवकन्या झाली विक्रीकर अधिकारी

वाहेगावची शिवकन्या झाली विक्रीकर अधिकारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यातील वाहेगाव सातारा येथील शिवकन्या विश्वनाथ पाईकराव हिची विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण भागातून हे यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यातील आष्टी येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यलयात शिवकन्या पाईकराव हिने विज्ञान शाखेची पदवी घेवून पुढे लोकसेवा आयोग परीक्षेचा अहोरात्र अभ्यास करून सन २०१६ मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. यामध्ये ती उत्तीर्ण झाली.
शिवकन्या पाईकराव हिस अप्पर राज्य कर कार्यालय नाशिक या ठिकाणचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या यशाबद्दल सभापती कपिल आकात, उपाध्यक्ष कुणाल आकात, प्राचार्य वाघमारे, एल. के. बिरादार, ए. आर. भिसे यांनी कौतुक केले आहे. शिवकन्याचा आदर्श इतर मुलींनी घेण्याची गरज आहे.
४शिवकन्या पाईकराव हिने वाहेगाव सोपारा सारख्या एका लहाशा खेड्यातून यश मिळवले आहे. शिवकन्याला पाच बहिणी, दोन भाऊ आहेत. वडील सेवानिवृत्त लाईनमन जेमतेम आर्थिक परिस्थिती असताना हे यश संपादन केले आहे. एक बहीण डॉक्टर, एक शिक्षिका आहे. इतर भावंडेही उच्च शिक्षित आहेत. ग्रामीण भागात राहून विक्रीकर अधिकारी होण्याचा मान शिवकन्या पाईकराव हिने मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: Sales tax officer of Vahegaon became a Shivnikanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.