धडक कारवाईने ‘भार्इं’ना सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:29 AM2018-06-28T01:29:36+5:302018-06-28T01:31:22+5:30
प्लास्टिक बंदी लागू होऊन पाच दिवस लोटले आहेत. असे असतानाच बुधवारी पालिकेचे भरारी पथक आळस झटकून कामाला लागले. दिवसभर बाजारपेठेत फिरून त्यांनी दहा क्विंटल प्लास्टिकचे सािहत्य जप्त करत, सात व्यापाऱ्यां कडून ४५ हजारांचा दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्लास्टिक बंदी लागू होऊन पाच दिवस लोटले आहेत. असे असतानाच बुधवारी पालिकेचे भरारी पथक आळस झटकून कामाला लागले. दिवसभर बाजारपेठेत फिरून त्यांनी दहा क्विंटल प्लास्टिकचे सािहत्य जप्त करत, सात व्यापाऱ्यां कडून ४५ हजारांचा दंड वसूल केला.
प्लास्टिक बंदी झाल्यानंतर किरकोळ कारवाई करत वेळ मारून नेण्याच्या भूमिकेत असलेल्या पालिका प्रशासनाने बुधवारी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच, तत्परता दाखवली. त्यातच गुरूवारी प्लास्टिक बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे जालन्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा विभागिय मेळावा येथे होत आहे. त्यामुळे बुधवारची पालिकेची ही कारवाई म्हणजे रामदास कदम यांचे स्वागत कारवाईने करणे हेच असल्याची चर्चा आहे.
बुधवारी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या सूचनेनुसार भरारी पथक प्रमुख पंडित पवार, सॅम्युअल कसबे, संतोष शिरगुळे, अशोक लोंढे, संजय खर्डेकर आणि विलास गावंडे यांनी येथील बाजारपेठेत अचानक दुकानांना भेटी देऊन ही कारवाई केली.
यात एस.एस.डी. रेडीमेंडस्, बिकाणा स्वीटमार्ट, विजय ट्रेडर्स, राजलक्ष्मी टेक्सस्टाईल, सद्गुरू ट्रेडर्स, आनंद डेअरी, राजमिलन मिठाई या व्यापा-यांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड वसूल केला.
जालना पालिका : कारवाईत सातत्य हवे
राज्य सरकारने प्लास्टिकपासून पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने, शनिवार पासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. याला नागरिक, व्यापा-यांकडून प्रतिसादही मिळत आहे. जालना पालिकेने बुधवारी जी कारवाई केली आहे, तसेच कारवाईत सातत्य हवे. जणेकरून शहरातून बंदी असलेले प्लास्टिकचे साहित्य नाहीसे होण्यास मदत ठरू शकेल.