वाळू वाहतूक; १३ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:40 AM2019-06-30T00:40:41+5:302019-06-30T00:41:28+5:30
अवैधरीत्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी १३ जणांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अवैधरीत्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी १३ जणांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री शहागड- गोंदी मार्गावर करण्यात आली होती. तर शनिवारी महसूल, पोलीस विभागाच्या पथकांनी तीन वाहनांवर कारवाई केली.
शहागड- गोंदी मार्गावर शुक्रवारी रात्री गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि शिवानंद देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर कारवाई केली होती. या प्रकरणी अनिल सुंदरसिंग परदेशी, शिवा मोरे (रा.पाथरवाला बु.ता. अंबड), बाळासाहेब सुदाम दाभाडे, कैलास भीमराव चव्हाण (रा. चित्तेगाव जि. औरंगाबाद), शरद सोळुंके, संतोष सखाराम कांबळे (रा.गोंदी ता.अंबड), मुस्ताक महंमद शेख (रा. खादगाव ता. पैठण ), पवन परमेश्वर भालेकर, शिवनाथ जनार्दन भालेकर (रा. गारखेडा, औरंगाबाद), बद्रिनाथ भालचंद्र वाघ, बिलाल नवाब शेख (रा. ईसारवाडी ता. पैठण), विश्वंभर रामनाथ जावळे (रा. आडगाव ता. पैठण), युवराज बाळाभाऊ जगताप (रा. सावरगाव, ता. माजलगाव), हायवा चालक -मालक या १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
शनिवारी सकाळी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी एक हायवा शहागड-गोंदी रस्त्यावर पकडला. तहसीलदार मनीषा मेने यांनी दुसरा हायवा येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर अंबड हद्दीत पकडला.
तर उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी.शेवगण यांनी सायंकाळी शहागड-गोंदी रस्त्यावर कुरण फाट्यावर अवैध वाळू तस्करी करताना एक हायवा पकडला. दोन दिवसांच्या कारवाईत एकूण अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल या प्रशासनाने जप्त केला आहे.