वाळू तस्करी; चार वाहने ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:27 AM2019-07-12T00:27:15+5:302019-07-12T00:27:38+5:30
अंबड तालुक्यातील कुरण, गोंदी शिवारातून अवैधरीत्या वाळूची तस्करी करणाऱ्या चार वाहनांवर महसूलच्या पथकाने कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड तालुक्यातील कुरण, गोंदी शिवारातून अवैधरीत्या वाळूचीतस्करी करणाऱ्या चार वाहनांवर महसूलच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली असून, यावेळी तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कुरण, गोंदी येथून अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल यांना मिळाली होती. या माहितीवरून हातगल यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. पालवे, पी. एच. सुलाने, पी. एन. गजरे, डी. जी. कुरेवाड, एस. बी. नरुटे, शेख राजू युसूफ, एन. व्ही. काचेवाड, एम. डी. गौषिक, एस. आर. सोरमारे, व्ही. एन. उफाड, डी. जी. लव्हाळे, पी. बी. शिनगारे या तलाठ्यांचे पथक स्थापन करून अंबड हद्दीतून जाणाºया वाहनांच्या मागावर होते. पथकाने डोणगाव फाट्यावर एक, अंकुशनगर येथे एक तर कुरण फाट्यावर दोन वाहने ताब्यात घेण्यात आली. वाहने शहागड पोलीस चौकीत लावण्यात आली आहेत. चालक रामप्रसाद सूर्यवंशी, समशेर पठाण, शेख नासेर शेख यासीन, शेख फिरोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पाचोड येथून शहागडच्या दिशेने केला पाठलाग
अंबड हद्दीतून संबंधित वाहनांचा माग काढत पथक पाचोड (जि. औरंगाबाद) कडून शहागडच्या दिशेने येत होते. त्यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारी १२ वाहने भरधाव पास झाली. तर डोणगाव ते कुरण फाटा दरम्यान चार वाहने पकडण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले.