वाळू वाहतुकीचे दोन टेम्पो पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:49 AM2019-02-28T00:49:27+5:302019-02-28T00:50:17+5:30

पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणारे २ टेम्पो २७ फेब्रुवारी रोजी सकाळी २ वाजेदरम्यान उस्वद- देवठाणा रोडवर अप्पर पोलीस अधिक्षकाच्या पथकांनी पकडले. सदर टेम्पो धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी आरोपीला अटक झालेली नाही.

Sand Traps caught two temps | वाळू वाहतुकीचे दोन टेम्पो पकडले

वाळू वाहतुकीचे दोन टेम्पो पकडले

Next
ठळक मुद्देआरोपी मोकाट : १० लाखांचा मुद्देमाल जप्त

तळणी : पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणारे २ टेम्पो २७ फेब्रुवारी रोजी सकाळी २ वाजेदरम्यान उस्वद- देवठाणा रोडवर अप्पर पोलीस अधिक्षकाच्या पथकांनी पकडले. सदर टेम्पो धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी आरोपीला अटक झालेली नाही.
उस्वद- देवठाणा व टाकळखोपा येथून दिवसरात्र अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु असल्याच्या माहीतीवरुन अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या पथकाने उस्वद- देवठाणा रोडवर अवैधरित्या एक ब्रास वाळुची चोरटी वाहतूक करणारे टेम्पो (एम. एच. २१-बी.एच. ४८०) व .(एम. एच. २८-एबी-५०२३) हे असून सुधाकर माधवराव सरोदे व महादेव उध्दव सरोदे (दोघे रा. उस्वद, ता. मंठा ) यांच्याविरुध्द गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत १० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पथकात विशाल काळे, प्रदीप घोडके, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखोरे, ए. एस. राजपुत, दीपक आढे यांचा समावेश होता.
सदर टेम्पोवर कारवाई न करता सोडून द्यावे, यासाठी पत्रकारांसमोर पथकातील पोलिसांसोबत तडजोडीची भाषा करण्याची वाळू माफियांमध्ये हिंमत येते कुठून, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना परिसरात घडल्या आहेत.

बेसुमार वाळू उपसामुळे पाणी टंचाई
पूर्णा नदीपात्रातून उस्वद- देवठाणा, टाकळखोपा, कानडी, सासखेडा, वाघाळा, पोखरी केंधळे, भूवन येथून दिवसरात्र अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतूक सुरु आहे. या अवैध वाळू चोरीमुळे नदीपात्र कोरडेठाक पडले असून पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
महसूल व पोलीस प्रशासन दुर्लक्ष
पूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळुची चोरी सुरू असून, या संदर्भात अनेक तक्रारीनंतरही मंठा महसूल व पोलीस प्रशासनकडून अद्यापही कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही.

Web Title: Sand Traps caught two temps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.