संजना जैस्वालची मॉस्को क्रॉसबो स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:15 AM2018-07-20T01:15:51+5:302018-07-20T01:16:33+5:30
जालन्यातील संजना वीरेंद्र जैस्वाल हिने अत्यंत हटके क्रीडा प्रकारावर आपले लक्ष केंद्रीत केले असून, आता पर्यंत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत कास्य, रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविले आहे. आता संजनाची निवड ही नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चँपिअन स्पर्धेसाठी भारती संघात निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यातील संजना वीरेंद्र जैस्वाल हिने अत्यंत हटके क्रीडा प्रकारावर आपले लक्ष केंद्रीत केले असून, आता पर्यंत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत कास्य, रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविले आहे. आता संजनाची निवड ही नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चँपिअन स्पर्धेसाठी भारती संघात निवड झाली आहे.
या स्पर्धेची तयारी संजनाने आतापासून चालविली असून, मॉस्कोत सुवर्णपदक मिळविण्याचे आपले लक्ष्य असल्याने तिने लोकमत शी बोलताना सांगितले.
शालेय जीवनापासूनच एअर रायफल क्रीडा प्रकारात तरबेज असलेल्या संजनाने नंतर तिचे करिअर हे क्रॉसबो क्रीडा प्रकारात करण्याचे ठरवले. क्रॉसबो हा क्रीडा प्रकार खूप खर्चिक आहे. त्यासाठी लागणारे आयुध - क्रीडा साहित्य हे अत्यंत खर्चिक आहे. असे असतानाही मला मात्र, महाराष्ट्र क्रॉसबो असोसिएशनने यासाठी मोलाचे सहकार्य केल्यानेच आपण येथपर्यंत पोहोचू शकल्याचे संजनाने आवर्जुन सांगितले. यापूर्वी संजनाने आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेले आहे.
नुकत्याच या राष्ट्रीय पातळीवर क्रॉसबो स्पर्धा उत्तर प्रदेश मधिल इटावा येथे पार पडल्या. त्या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची मॉस्कोत होणाºया जागतिक क्रॉसबो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यासाठी संजनाला चंद्रमोहन तिवारी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितले. या क्रॉसबो क्रीडाप्रकाराकडे आपण पंजाबमधील मित्रांच्या माध्यमातून वळलो असून, आता मॉस्कोत होणा-या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक आणणने हे आपले व आई-वडिलांचे स्वप्न असल्याचे ती म्हणाली. तसेच पुढीलवर्षी देखील वर्ल्ड क्रॉसबो चॅम्पियन स्पर्धा होणार असून, त्यासाठी मॉस्कोच्या स्पर्धा महत्वाच्या ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
बोमियाच्या माध्यमातून एकाग्रता
क्रॉसबो या क्रीडा प्रकारात १८ आणि ३५ मीटर अंतरावरून लक्ष्य साध्य करावे लागते. तीन मिनिटात तीन संधी यासाठी दिल्या जातात. एकूण ३२ शॉटस् खेळण्याच संधी असते. या क्रीडा प्रकारात जी एअररायफल असते, ती चालविण्यासाठी तुमच्या खांद्याच्या आणि पायाच्या मसल्समध्ये मोठी ताकद लागते. यासाठी नियमितपणे व्यायाम तसेच आहारावर नियंत्रण आणि मनाची एकाग्रता महत्वाची ठरते. एकाग्रतेसाठी योगसाधना सोबतच बोमिया या नवीन व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून हे साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संजनाने सांगितले.