संजय राऊत यांच्या प्रतिमेस मारले जोडे; शिवसेना शिंदे गटाचे जालन्यात आक्रमक निदर्शने
By विजय मुंडे | Published: June 3, 2023 06:11 PM2023-06-03T18:11:50+5:302023-06-03T18:12:28+5:30
शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी खा. संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारत तीव्र निषेध नोंदविला.
जालना : शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर खा. संजय राऊत हे थुंकले होते. खा. संजय राऊत यांच्या या कृतीचा जालना येथील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शनिवारी निषेध नोंदवित राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी खा. संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारत तीव्र निषेध नोंदविला. त्यांच्या कृतीचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या वतीने हे जोडे मरो आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख पंडीत भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश घुमरे, महिला आघाडीच्या ढगे, संतोष मोहिते, फेरोज लाला तांबोळी, दिनेश भगत, नरेश खुदभैय्ये, कमलेश खरे, अजय कदम, योगेश रत्नापरखे, किरण शिरसाठ, सुशील भावसार, सखाराम लंके, भरत कुसुंदल, ॲड. अशपाक पठाण, दीपक वैद्य, राजू पवार, भोला कांबळे, पिटर खंदारे, चंदू निर्मल, ताहेर खान, जफर खान, गोपी गोगडे, संतोष जांगडे, निखिल पगारे, किशोर पांगकर, राम सतकर, मनोज धानुरे, संजय शर्मा, भूषण बनकर, आदित्य खंडागळे, आलम खान पठाण, महमूद कुरेशी, रमेश टेकुर, संताजी वाघमारे, विजय जाधव, सागर पाटील, किशोर शिंदे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.
संताप आला तर हिमालयात जावे: अर्जुन खोतकर
खा. संजय राऊत यांनी केलेले कृत्य हे त्यांची संस्कृती दाखविणारे असून, त्यांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध केला जात आहे. कुणाचे नाव घेतले तर अशा प्रकारे थुंकणे हे त्यांची संस्कृती दाखविणारे कृत्य आहे. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत त्यांचा निषेध नोंदविला आहे. संजय राऊत यांना संताप आला तर इतरांच्या नावाने कशाला थुंकावे. संताप आला तर हिमालयात जावे, अंगाला भस्म लावून फिरावे. परंतु, अस संताप कोणत्या कामाचा असा सवालही माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी केला.