संजय सिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 06:15 PM2024-11-19T18:15:17+5:302024-11-19T18:16:48+5:30

एक मित्र म्हणून मी त्यांना नेहमी भेटत असतो, विचारपूस करत असतो, असे संजय सिरसाठ म्हणाले.

Sanjay Sirsat met Manoj Jarange, both discussed for half an hour | संजय सिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

संजय सिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

वडीगोद्री (जालना) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय सिरसाट यांनी मंगळवारी सकाळी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे.

या भेटीवर बोलताना संजय सिरसाट म्हणाले, काही दिवसांपासून मनोज जरांगे यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून आज वेळ मिळाल्यानंतर त्यांची भेट घेतली. माझा व मनोज जरांगे यांच्यासोबत स्नेहपूर्ण संबंध आहेत. राजकारणाव्यतिरिक्त काही विषय असतात. त्याविषयी चर्चा केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील थोडीफार चर्चा झाली. एक मित्र म्हणून मी त्यांना नेहमी भेटत असतो, विचारपूस करत असतो, असे संजय सिरसाठ म्हणाले.

सर्वपक्षीय नेत मला भेटतात
संजय शिरसाट यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, रोजच विविध पक्षाचे नेते मला भेटतात. मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचे आहे. सत्तेत कोणी आले तरी मला आणि मराठा समाजाला लढावे लागणार आहे. म्हणून आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करत असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.

संत, महंतांना मानणारे आम्ही लोक
कालीचरण महाराजांवर टीका करताना मनोज जरांगे हे पुन्हा भडकले. ते म्हणाले, संत, महंतांना मानणारे आम्ही लोक आहोत. आरक्षण आणि कालीचरण बाबाचा संबंध काय येतो. बाबांनी आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केले पाहिजे. हे त्यांचे काम असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.

Web Title: Sanjay Sirsat met Manoj Jarange, both discussed for half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.