संत चोखासागर ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:04 AM2021-09-02T05:04:41+5:302021-09-02T05:04:41+5:30

देऊळगाव राजा : तालुक्यातील खडकपूर्णा (संत चोखासागर) प्रकल्प ८० टक्के भरला असून, धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता ...

Sant Chokhasagar on the way to overflow | संत चोखासागर ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर

संत चोखासागर ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर

Next

देऊळगाव राजा : तालुक्यातील खडकपूर्णा (संत चोखासागर) प्रकल्प ८० टक्के भरला असून, धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरण्याचे संकेत असून, धरण सुरक्षा व पूरनियंत्रण लक्षात घेता प्रकल्पाचे तीन दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदीपात्रात होणार असल्याची माहिती शाखा अभियंता रोहित मोर्या यांनी दिली.

बुलडाणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी तिरमारे, प्रकल्प निरीक्षक राहुल गुंजाळ, शाखा अभियंता रोहित मोर्या, पुरुषोत्तम भागिले, बी.एस. खार्डे, योगेश भगिले आदींनी प्रकल्पाची पाहणी केली. देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू, डिग्रस, सावंगी टेकाळे, टाखरखेड वायाळ, टाखरखेड भागिले, सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा, राहेरी, तडेगाव, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुडा, लिंगा, लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगव, सावरगाव तेली, जिंतूर तालुक्यातील किर्ला, दुधा, सासखेडा, लिंब खेडा, हुंमनत खेडा, अस्वद, टाखळखोपा, इंचा कानडी देवठाणा, वझर भामटे, शेंनगाव तालुक्यातील धानोरा या नदीकाठच्या गावांतील लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

फोटो

Web Title: Sant Chokhasagar on the way to overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.