लोकसभेत बसला फटका,पण विधानसभेत परतफेड; भोकरदनमधून संतोष दानवे यांची हॅटट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 07:41 PM2024-11-25T19:41:07+5:302024-11-25T19:42:42+5:30

महाविकास आघाडीचे उमेदवार चद्रकांत दानवे यांचा सलग तिसऱ्यांदा झाला पराभव

Santosh Danve's hat trick from Bhokardan; defeat chandrakant danave | लोकसभेत बसला फटका,पण विधानसभेत परतफेड; भोकरदनमधून संतोष दानवे यांची हॅटट्रिक

लोकसभेत बसला फटका,पण विधानसभेत परतफेड; भोकरदनमधून संतोष दानवे यांची हॅटट्रिक

भोकरदन ( जालना):भोकरदन विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार संतोष रावसाहेब दानवे यांनी २३,१७९ मते घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार चद्रकांत दानवे यांचा तिसऱ्यांदा पराभव केला आहे.

भोकरदन मतदारसंघात एकूण ३२ उमेदवार आखाड्यात होते. यात संतोष दानवे आणि चद्रकांत दानवे यांच्यात लढत झाली आहे. संतोष दानवे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते ते कायम आघाडीवरच राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यामुळे आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा आत्मविश्वास असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांचा २३,१७९ मतांनी पराभव झाला असून, त्यांना १,०५,३०१ एवढी मते पडली आहे.

या भोकरदन मतदारसंघात १९ अपक्ष उमेदवार होते. त्यामुळे मतांचे अधिक विभाजन होईल, असे वाटले होते. परंतु, या अपक्षाचा निवडणुकीवर फारसा काही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे.

विजयाची तीन कारणे
१) भोकरदन मतदारसंघात संतोष दानवे यांनी आमदार असताना विविध विकासकामे केली असून, त्यांची आर्थिक बाजूही बळकट आहे.
२)लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे नियोजनबद्ध प्रचार करण्यावर भर दिला होता.
३) महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाला.

दानवेंच्या पराभवाची कारणे...
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांचा पराभव झाला असून, त्याची विविध कारणे आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ दिसून आला नाही. तसेच, आपणच विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास नडला. मतदारसंघात नियोजनबद्ध प्रचार करण्यात अपयशी ठरले आहेत.

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते: 
चंद्रकांत पुंडलिकराव दानवे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी रदचंद्र पवार १,०५,३०१
संतोष रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टी १,२८,४८०
राहुल जालिंदर छडीदार बहुजन समाज पार्टी ८७०
अंजली सांडू भुमे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक १२०
गजानन सीताराम बर्डे भारतीय ट्रायबल पार्टी ३५१
डिंगाबर बापूराव कऱ्हाळे भारतीय वीर किसान पार्टी १६७
दीपक भीमराव बोऱ्हाडे वंचित बहुजन आघाडी २०३१
मयूर रामेश्वर बोर्डे स्वाभिमानी पक्ष ४९३
विकास विजय जाधव महाराष्ट्र स्वराज्य पार्टी ५२८
ॲड. साहेबराव माधवराव पंडित हिंदुस्तान जनता पार्टी ३५७
ॲॅड. फकिरा हरी सिरसाठ पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ९८
सुनील गिनाजी इंगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक १०८
सुनील लक्ष्मणराव वाकेकर विदुथलाई चिरुथईगल काटची १०५
अकबरअली अक्रमअली खान अपक्ष १३३
कडूबा म्हातारबा इंगळे अपक्ष ५८८
केशव आनंदराव जंजाळ अपक्ष ३६९९
केशव रामकिसन देठे अपक्ष १५४४
कैलास रामदास पाजगे अपक्ष १११५
गणेश रतन साबळे अपक्ष १८९
चंद्रशेखर उत्तमराव दानवे अपक्ष १०३
जगदीश दिलीप राऊत अपक्ष ७३
जगन तुकाराम लोखंडे अपक्ष ३९
दिवाकर कुंडलिक गायकवाड अपक्ष ६८
नासेर दाऊद शेख अपक्ष १२७
निलेश बळीराम लाठे अपक्ष १६१
महादू लक्ष्मण सुरडकर अपक्ष १५२
यासीन सलीम मदार अपक्ष ७१
योगेश पाटील शिंदे अपक्ष ६९
रफीक अब्बास शेख अपक्ष ९०
रवी विजयकुमार हिवाळे अपक्ष १८९
वैशाली सुरेश दाभाडे अपक्ष २३७०
शिवाजी आत्माराम भिसे अपक्ष ५१९

Web Title: Santosh Danve's hat trick from Bhokardan; defeat chandrakant danave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.