सरपंच आरक्षण झाले जाहीर; जाणून घ्या भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायतींचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:14 PM2021-01-28T18:14:00+5:302021-01-28T18:17:03+5:30
Sarpanch Reservation पूर्वी निबोळा, दहिगाव, पाळसखेड ठोबरे/पिंपळगाव बारव, पिंपरी, वालसा डावरगाव, निमगाव, कुंभारी या सर्वसाधारण निघालेल्या सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.
भोकरदन ( जालना ) : भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. पूर्वी निबोळा, दहिगाव, पाळसखेड ठोबरे/पिंपळगाव बारव, पिंपरी, वालसा डावरगाव, निमगाव, कुंभारी या सर्वसाधारण निघालेल्या सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.
सरपंच पदाच्या निवडीसाठीचा घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्य सरकारने निवडणूकी पूर्वी काढण्यात आलेले आरक्षण रद्द केले होते. ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठीची नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतिच्या चिठ्या प्रज्ञा प्रमोद कांबळे या मुलीच्या हस्ते काढण्यात आल्या. या वेळी नायब तहसीलदार बालाजी पापुलवाड, कर्मचारी संजय सपकाळ, राहुल लबडे, विठ्ठल मालोदे, अनिल वानखेडे, स्वप्नील देवकाते आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आरक्षण पुढील प्रमाणे :
अनुसूचित जातीसाठी आरक्षित :-
लतीफपुर, पिंपळगाव सुतार, गोकुळ, पारध बु, देहेड, पिंपळगाव शेरमूलकी, सिपोरा बजार, पिंपळगाव रेणुकाई, वजीरखेड/देऊळगाव कमान, दगडवाडी, जळगाव सपकाळ, मानापूर, विझोरा, बरंजळा लोखंडे,
अनुसूचित-जमाती आरक्षित :
वाढोना, पद्मावती, सुरंगळी, धोंडखेडा, कोठा कोळी
नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित :
गोषेगाव, वरुड बु, माळेगाव, जानेफळ दाभाडी/टाकळी बाजड/टाकळी हिवरडी, कोपरडा, खंडाळा, सावंगी अवघडराव, कोठा जहांगीर, कल्याणी, वाडी बु/वाडी खु, खापरखेडा, पिंपळगाव कोलते, वडोद तांगडा, करजगाव, मालखेडा, कोदोली,तपोवन, बरंजळा साबळे, सिरसगाव वाघृळ/बोरगाव खडक, आव्हाना ठालेवाडी, गव्हाण संगमेश्वर, मोहळाई,सुभानपूर, वाकडी/कुकडी, लेहा, खामखेडा,बेलोरा, निबोळा, दहिगाव,पाळसखेड ठोबरे/पिंपळगाव बारव, पिंपरी, वालसा डावरगाव, निमगाव, कुंभारी,
सर्वसाधारण गटासाठी आरक्षित :
तांदुळवाडी, मुठाड, जवखेडा खु, पिंपळगाव थोटे, वालसा वडाळा, वालसा खालसा, राजूर, हसनाबाद, नळणी बु, तिगलखेड, कठोरा बाजार, जवखेडा ठोबरी, चिंचोली/बोरगाव तारू/देऊळगाव ताड, उमरखेडा, पाळसखेड दाभाडी, लिंगेवाडी, मलकापूर, नांजा/क्षिरसागर, कठोरा जेनपुर, पोखरी/मेहेगाव, टाकळी भोकरदन, लोणगाव, केदारखेडा/मेरखेडा, जानेफळ गायकवाड, शेलुद, शिरसगाव मंडप, बोरगाव जहांगीर, पाळसखेड पिंपळे, आनवा/करलावाडी,पेरजापुर/प्रल्हादपुर/राजापूर, हिसोडा खु,आडगाव, जवखेडा बु, ताडकळस, भिवपूर, सावखेडा/खदगाव, कोदा, आलापूर/रामपूर, धावडा, चांदई ठेपली, तडेगाव/तडेगाव वाडी, भायडी/तळणी,/विरेगाव, चांदई एक्को, इब्राईमपूर, गोद्री, रेलगाव, बानेगाव, पारध खुर्द, रजाळा, सोयगाव देवी, ईटा/रामनगर, खडकी, दानापूर, दावतपुर, बाभुळगाव,पाळसखेड मूर्तड, एकेफळ, फत्तेपुर, भोरखेडा, चांदई ठोबरी,कोसगाव, आणवा पाडा, कोठा दाभाडी, वालसावगी, गारखेडा/जोमाळा, कोळेगाव, चोरहाळा/मासनपूर, जयदेववाडी.
# सर्वसाधारण साठी :- 69 ग्रामपंचायती
# अनुसूचित जातीसाठी :- 16
# अनुसूचित जमातीसाठी :- 5
# नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी(ओबीसी) :- 34