आमदारांसमोर सरपंचांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:58 AM2020-02-18T00:58:44+5:302020-02-18T00:59:28+5:30

रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Sarpanchs read the issues before the MLAs | आमदारांसमोर सरपंचांनी वाचला समस्यांचा पाढा

आमदारांसमोर सरपंचांनी वाचला समस्यांचा पाढा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जालना मतदार संघातील सरपंच व ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.
या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, पं.स. सभापती, उपसभापती, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य यांच्यासह सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.
यावर्षी जालना तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. परंतु, तरीही तालुक्यातील काही गावांना मार्चनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी आपण आज ही बैठक बोलवली असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. त्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांकडून गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. काही सरपंचांनी ग्रामसेवकांनी बैठकीची पूर्वकल्पना दिली नसल्याचे सांगितले. या मुद्यांवरून त्यांनी संबंधित ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले.
त्यानंतर प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी पाणीटंचाईची माहिती दिली. पाईपलाईन दुरूस्ती, हातपंप दुरूस्ती, बोअरची दुरुस्ती, पाणीटंचाई निवारणार्थ बोअर, विहीर घेणे, रोहित्र उपलब्ध करून देणे, विहिरींचा गाळ काढणे आदी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या आढावा बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महावितरणच्या अधिका-यांची उडाली भंबेरी
जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी उपलब्ध आहे. परंतु, रोहित्र नसल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्र्माण होत आहे. रोहित्र नसणे, रोहित्रावर लोड येणे, पोल खराब होणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून, ज्या गावांना रोहित्राची गरज आहे. तेथे तातडीने रोहित्र देण्यात यावे, अशी मागणी काही सरपंचांनी केली. याबाबत आ. गोरंट्याल यांनी महावितरणच्या अधिका-याला विचारले असता, उत्तर देताना अधिका-याची चांगलीच भंबेरी उडाली. त्यानंतर आ. गोरंट्याल यांनी ज्या गावांना रोहित्राची गरज आहे, त्या गावांना तातडीने रोहित्र देण्याचे सांगितले.
कडवंचीला करणार मॉडर्न व्हिलेज
जालना तालुक्यातील कडवंची हे गाव जगाच्या नकाशावर आहे. या गावाला भेट देण्यासाठी नेहमी देशभरातील लोक येतात. परंतु, या गावाला जाणा-या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील पूलही मोडकळीस आला आहे. या पुलाच्या कामाचे अनेक वेळा नारळ फोडण्यात आले. परंतु, अद्यापही पुलाचे काम झाले नाही. कडवंची हे आदर्श गाव आहे. त्यामुळे या गावाला आपण येणा-या काळात मॉर्डन व्हीलेज करणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सरपंचांसह पदाधिका-यांनी गावा- गावातील समस्याही यावेळी मांडल्या.

Web Title: Sarpanchs read the issues before the MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.