गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी भावसरिता संगीत मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:46 AM2018-03-14T00:46:22+5:302018-03-14T00:46:25+5:30

रूक्मिणी परिवाराच्या वतीने नववर्षानिमित्त गुढी पाडव्यानिमित्त १७ मार्च रोजी सायं. ७ वाजता रुक्मिणी गार्डन येथे भावसरिता संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 On Saturday, Bhavsarita music concert in Jalna | गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी भावसरिता संगीत मैफल

गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी भावसरिता संगीत मैफल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील रूक्मिणी परिवाराच्या वतीने नववर्षानिमित्त गुढी पाडव्यानिमित्त १७ मार्च रोजी सायं. ७ वाजता रुक्मिणी गार्डन येथे भावसरिता संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील १८ वर्षापासून रूक्मिणी परिवार गुढी पाडवा व नववर्षानिमित्त संगीत मैफलीचे आयोजन करत आहे. यावर्षी जालनेकर रसिकांसाठी मराठी संगीतकार केशवराव भोळे यांच्यापासून ते आजचे तरूण संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिलेल्या रचनांचा आस्वाद घेता येणार आहे.
झी टीव्ही मराठीचे प्रसिद्ध कलावंत राजेश दातार, सायली परांजपे-दातार, संदीप उबाळे, प्रज्ञा देशपांडे हे गाणी सादर करणार आहेत. या मैफलीची निर्मिती व संकल्पना पुणे येथील प्रसिद्ध तबला वादक प्रशांत पांडव यांची असून निवेदन मिलींद कुलकर्णी यांचे तर साथसंगत प्रशांत पांडव, समीर बंकापुरे, दीप्ती कुलकर्णी, विवेक परांजपे यांचे राहील. मैफिलीसाठी प्रवेश नि:शुल्क आहे.
नागरिकांनी प्रवेशिका घेऊन पाडव्याच्या पूर्वसंध्येला होणा-या या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन रूक्मिणी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title:  On Saturday, Bhavsarita music concert in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.