लोकवर्गणीतून बदलले सावंगी जि.प. शाळेचे रुपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:07 AM2018-12-13T01:07:10+5:302018-12-13T01:07:24+5:30

शाळा व समाज यांचा जर समन्वय असेल तर शाळेचे रुपडे बदलायला वेळ लागत नाही. याचा जीवंत प्रत्येय नुकताच जाफराबाद तालुक्यातील सावंगी या छोटयाशा गावाने आणून दिला आहे.

Savangi district changed from public domain School uniforms | लोकवर्गणीतून बदलले सावंगी जि.प. शाळेचे रुपडे

लोकवर्गणीतून बदलले सावंगी जि.प. शाळेचे रुपडे

Next
ठळक मुद्देशाळेची इमारत बनली जणू रेल्वे : प्रत्येक खोली रेल्वेचा डबा, ग्रामस्थ व शिक्षकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : शाळा व समाज यांचा जर समन्वय असेल तर शाळेचे रुपडे बदलायला वेळ लागत नाही. याचा जीवंत प्रत्येय नुकताच जाफराबाद तालुक्यातील सावंगी या छोटयाशा गावाने आणून दिला आहे.
सावंगी हे दिड ते दोन हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव. या गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ५ पर्यंतची शाळा आहे. यावर्षी झालेल्या शिक्षकांच्या बदल्यात शाळेत काही नवीन शिक्षक बदलून आले. यात शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार उपक्रमशील शिक्षक रमेश साळवे यांच्याकडे आला. त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शाळेच्या रंगरंगोटी चा मनोदय बोलून दाखविला. यासाठी समितीने सर्वपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देवून लोकवर्गणी जमा करण्यासाठी पुढाकार घेतला. बघता बघता आठ दिवसांत शिक्षक व ग्रामस्थांनी मिळून ४१ हजार एवढा निधी उभा केला.
या लोकवर्गणीतून आज सावंगी शाळेचे आंतरबाह्य रुप बदलले आहे. शाळेचे रूपडे एका रेल्वेच्या रुपात पालटले आहे. शाळेच्या खोल्यांंना रेल्वे प्रमाणे सजविण्यात आले असल्याने प्रत्येक वर्ग जणू रेल्वेचा एक डबा दिसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही हुरूप वाढला आहे. केवळ १५ दिवसांत रंगरंगोटी ने नटलेली ही शाळा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शाळेच्या या रंगरंगोटीसाठी सावंगीच्या सरपंच स्वाती वरगणे, उपसरपंच सत्यभामा वरगणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी वरगणे, उपाध्यक्ष सुरेश राऊत, मुख्याध्यापक रमेश साळवे, शिक्षक अनिल वाघ, लता सपकाळ, ज्योती धनवई, ग्रामसेविका माधुरी अवचार, किशोर वरगणे, दीपक वरगणे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Savangi district changed from public domain School uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.