सेवली दंगल; एकास जन्मठेप
By admin | Published: May 31, 2017 03:30 AM2017-05-31T03:30:09+5:302017-05-31T03:30:09+5:30
सेवली येथील दंगलीतील २१ दोषींना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस.कौसमकर यांनी मंगळवारी शिक्षा सुनावली. एकास
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सेवली येथील दंगलीतील २१ दोषींना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस.कौसमकर यांनी मंगळवारी शिक्षा सुनावली. एकास जन्मठेपेची, तिघांना दहा वर्षांची तर अन्य १७ सिद्धदोष आरोपींना प्रत्येकी एका वर्षाची शिक्षा सुनावली.
सेवली गावात ३ मार्च २००८ मध्ये गाणे वाजविण्याच्या कारणावरून दोन गटात दंगल झाली होती. त्यात बळीराम बाबूराव जाधव व संतोष सखाराम गवाळकर यांचा मृत्यू झाला होता. मंठा पोलीस ठाण्यात खून, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण, मालमत्तेचे नुकसान, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.
एस. कौसमकर यांनी आरोपी शेख ख्वॉजा शेख कुरेशी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.