सावता परिषदेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:38 AM2018-11-29T00:38:09+5:302018-11-29T00:39:11+5:30

महात्मा ज्योतीबा फुले यांचे राज्य सरकारने स्मारक उभारावे, या मागणीसाठी बुधवारी सावता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

Savta Parishad's Dare movement | सावता परिषदेचे धरणे आंदोलन

सावता परिषदेचे धरणे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महात्मा ज्योतीबा फुले यांचे राज्य सरकारने स्मारक उभारावे, या मागणीसाठी बुधवारी सावता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्या साधून सावता परिषदेच्या वतीने हे आंदोलन राज्यभर करण्यात येत आहे.
यात म. ज्योतीबा फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवावे, जातीनिहाय जनगणना करुन आकडेवारी जाहीर करावी आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जनार्द़न बारवकर, परमेश्वर ढवळे, रामजी कोरडे, भगवान उगले, बळीराम पुंड, नंदकिशोर पुंड, गजानन पुंड, राधेशाम गाडेकर, महेश चिंचाणे, कैलास मगर, शाम सातपुते, विष्णू मगर, शंकर मगर आदींची उपस्थिती होती. संतोष जधडे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले.

Web Title: Savta Parishad's Dare movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.