जालना तहसीलसच्या वीस हजार दस्ताऐवजाचे स्कॅनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:24 AM2018-03-12T00:24:37+5:302018-03-12T00:24:42+5:30
जुन्या दस्ताएवजाचे जतन व्हावे यासाठी तहसील कार्यालयात दस्ताऐवजाचे स्कॅनींग करण्यत येत आहे.आत्तापर्यत २० हजार विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. यामुळे एका क्लिकवर दस्ताएवज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुन्या दस्ताएवजाचे जतन व्हावे यासाठी तहसील कार्यालयात दस्ताऐवजाचे स्कॅनींग करण्यत येत आहे.आत्तापर्यत २० हजार विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. यामुळे एका क्लिकवर दस्ताएवज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
अनेक वर्षापासून शासकीय कार्यालयातील दस्ताऐवजाचे व्यवस्थित पणे जतन होत नसल्याने विविध कागदपत्रे जिर्ण झाले आहेत. परिणामी एखाद्या जुन्या प्रकाणात संबधीत प्रकरणाचे कागदपत्र मिळण्यास अडचणी येताता. परिणामी त्या प्रकरणाची निकाल देण्यास अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. तसेच सर्वत्र डिजीटाजेशन होत असतांना शासकीय दस्ताऐवजाचे डिजीटायजेशन करण्यात येत आहे. यामुळे तहसील कार्यालयातील गावचे नकाशे, महसुलचे दस्ताऐवज, सातबारे, भूमिअभिलेख आदी स्कॅनिंग करण्यात येत आहे. अशा सूचनाच राज्यशासनाने दिल्या आहेत.यामुळे तहसील विभागाच्या कर्मचाºयांनी सात लाख दस्ताऐवज्यापैकी २० हजार सातबारे, गावचे नकाशे, जिर्ण झालेले कागदपत्र आदीसह पंधरा प्रकारचे विविध दस्ताऐवजाचे स्कॅन केले आहे. उर्वरीत दस्ताऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत असल्याचे तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी सांगितले.
दिलेल्या वेळेत स्कॅनिंग
पूर्ण करणार
४उर्वरीत दस्ताऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत असून मार्च अखेर संपूर्ण दस्ताऐवजाचे स्कॅन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी सांगितले.