अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:56 AM2021-02-05T07:56:56+5:302021-02-05T07:56:56+5:30
जालना : तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये जाहीर करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती तसेच अनुसूचित ...
जालना : तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये जाहीर करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती सरपंचपदाचे आरक्षण जैसे थे असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि आणि सर्वसाधारण प्रवर्ग सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये काहीसा बदल झाला आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीत इच्छुकांना झटका बसला आहे.
तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचा तपशील देण्यात आला आहे. त्यात १९ ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी, दोन ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी तसेच ३३ ग्रामपंचायतीचे सरपंचपद नगारिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. तर ६९ ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी वरखेड, पाहेगाव, मोहाडी, मौजपुरी, माळेगाव, राममूर्ती, घोडेगाव, पिंपरी डुकरी, शिवनी, निरखेडा, दहिफळ, बापकळ, बाजिउम्रद, हस्ते पिंपळगाव, हातवन, सावरगाव भागडे, सावरगावहडप, खरपुडी, गुंडेवाडी, नाव्हा, गोलापांगरी, कारला, धारकल्याण, मजरेवाडी, मानेगाव जहागीर, भाटेपुरी, मानेगाव खालसा, सामनगाव, साळेगावहडप, नंदापूर, सोनदेव, अहंकार देऊळगाव या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. अनुसूचित जातीसाठी बोरखेडी, कोळवाडी, पिंपळवाडी, शंभूसावरगाव, पोकळवडगाव, एरंडवडगाव, खांबेवाडी, ममदाबाद, श्रीकृष्ण नगर, मोतीगव्हाण, हिस्वन बुद्रुक, ढगी, खणेपुरी, पळसखेडा, निपाणी, पोखरी उटवद, सोमनाथ जळगाव, कचरेवाडी, इंदलकरवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी वरूड आणि घाणेवाडी ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले आहे. इतर ग्रामपंचायती ६९ खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.
परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार तुषार निकम, परिविक्षाधीन तहसीलदार शीतल बंडगर, दिलीप सोनवणे यांनी ही आरक्षण सोडत जाहीर केली.
महिला आरक्षण सोडत सोमवारी
तालुक्यातील ग्रामपंचायतीतील महिलांचे आरक्षण सोमवारी १ फेब्रुवारी रोजी घोषित केले जाणार आहे. त्यामुळे कोण-कोणत्या ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित होतात यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु, आज जाहीर झालेल्या आरक्षणानंतर अनेकांनी सरपंचपदासाठी तयारीही सुरू केली आहे.