स्कूल बसला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:36 AM2018-09-29T00:36:02+5:302018-09-29T00:36:17+5:30
घनसावंगी तालुक्यातील मुरमा ते भोगगाव रोडवर बानेगाव येथील इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसला खड्डे चुकवत असताना किरकोळ अपघात होऊन बस रोडच्या बाजूने असलेल्या पंख्यात कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपूरी : घनसावंगी तालुक्यातील मुरमा ते भोगगाव रोडवर बानेगाव येथील इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसला खड्डे चुकवत असताना किरकोळ अपघात होऊन बस रोडच्या बाजूने असलेल्या पंख्यात कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली. यात दहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, ग्रामस्थांनी तात्काळ विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर काढले.
भोगगाव येथील बस (एम. एच. १४- ८०२९) ही बस घेऊन चालक अंगद जंगले बानेगाव येथून तीर्थ पुरीकडे जात असताना रोडचे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात बस रोडच्या पंख्यावर जाऊन कोसळळी.
यात चैतन्य उढाण, श्रेया पानखडे, फालक फलके, गौरव उढाण, तनुजा उढाण, सोहम उढाण, अमृता उढाण हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून मुरमा ते भोगगाव रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असुन, या रस्त्याचे काम करावे यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत.
विशेष म्हणजे या मुरमा ते भोगगाव रस्त्यावर अनेक अपघात घडले असून, दोन गर्भवती मातांची रस्त्यातच प्रसूतीही झाल्याची घटना घडली आहे.