गणेशपूरची शाळा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:18 AM2019-02-24T01:18:16+5:302019-02-24T01:18:41+5:30

गणेशपूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी तयार केलेल्या ‘माझा वर्ग करणार इंग्रजी साक्षर’ या व्हिडिओला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला

School of Ganeshpur first in the state | गणेशपूरची शाळा राज्यात प्रथम

गणेशपूरची शाळा राज्यात प्रथम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यातील गणेशपूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी तयार केलेल्या ‘माझा वर्ग करणार इंग्रजी साक्षर’ या व्हिडिओला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला असून, यामुळे गणेशपूरचे नाव पुन्हा राज्यस्तरावर झळकले आहे.
‘लिफ फॉर वर्ड’ या संस्थेच्या माध्यमातून ‘माझा वर्ग करणार इंग्रजी साक्षर’ यावर व्हिडीओ स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत गणेशपूर येथील जि.प. शाळेनेही सहभाग घेतला होता. शाळेतील शिक्षक रमेश कुलकर्णी यांनी चौथीतील विद्यार्थिनी गायत्री रामेश्वर लाटे हिचा शब्द वाचन करतानाचा व्हिडीओ तयार केला. या ुव्हिडीओला राज्यस्तरावर प्रथम क्रंमाक मिळाला.
लिफ फॉर वर्ड या संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात शिक्षक रमेश कुलकर्णी व विद्यार्थिनी गायत्री लाटे यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ही स्पर्धा यू-ट्यूबवर घेण्यात आली. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील, विस्तार अधिकारी प्रेरणा हरबडे, गटसमन्वयक कल्याण बागल, योगेश औटी, स्मिता रोडगे, अशोक राठोड, रामेश्वर लाटे, श्रीकृष्ण सागडे, पांडुरंग सागडे, उध्दव सागडे, गणेश सागडे, मानवतकर, वाघ, लिपणे आदींनी कौतुक केले.
गुलाबी गाव म्हणूनही ‘गणेशपूरचा’ गौरव
यापूर्वीही शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी शाळेच्या सर्व भिंती, परिसर, गावातील भिंतीवर रंगरंगोटी करून बोलक्या केल्या होत्या. तसेच संपूर्ण गावाला ‘गुलाबी’ रंग देवून या गावाची गुलाबी गाव म्हणून राज्यभरात ओळख करुन दिली होती.

Web Title: School of Ganeshpur first in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.