विद्यार्थ्यांसाठी शाळा हे संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:23 AM2018-07-31T00:23:36+5:302018-07-31T00:23:55+5:30
लोकमत समूहाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून संस्काराचे मोती हा विशेष उपक्रम सुरू केल्याने त्याचा मोठा लाभ विद्यार्थ्यांना होईल, असे प्रतिपादन येथील दामिनी पथकप्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संस्कारक्षम पिढी निर्मिती करणारे केंद्र म्हणजेच शाळा असते. विद्यार्थी मनावर जे संस्कार तुमच्यावर केले जातात, त्याचा परिणाम तुमच्या भविष्यातील चांगल्या जडण-घडणीवर होतो. लोकमत समूहाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून संस्काराचे मोती हा विशेष उपक्रम सुरू केल्याने त्याचा मोठा लाभ विद्यार्थ्यांना होईल, असे प्रतिपादन येथील दामिनी पथकप्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे यांनी केले.
सोमवारी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्काराचे मोती या उपक्रमाचा शुभारंभ नवयुवक प्राथमिक विद्यालयात करण्यात आला. यावेळी दामिनी पथकातील अन्य महिला पोलीस कर्मचारीही यावेळी उपस्थित होत्या. प्रारंंभी लोकमतचे शाखा व्यवस्थापक मकरदं शहापुरकर यांनी लांडगे यांचा सत्कार केला. तर जिल्हा प्रतिनिधी संजय देशमुख यांनी नवयुक शाळेचे मुख्याध्यापक एस.डी. हजारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी निलेश गिरगावकर यांनीही उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. पुढे बोलताना नालंदा लांडगे म्हणाल्या की, भविष्यात काही तरी व्हायचे असल्यास वाचनाची आवड ही विद्यार्थी दशेपासून असायला हवी, आपणही वर्तमानत्र अत्यंत बारकाईने वाचातो. त्यामुळे जगात आणि आपल्या भोवताली काय सुरू आहे, याची माहिती मिळून, ज्ञानात भर पडत असल्याचे सांगितले. लोमतमधून ज्या दर्जेदार बातम्यासोबतच आता स्पर्धा परीक्षे संदर्भात ते स्वतंत्र सदर सुरू केले आहे, त्याचा मोठा उपयोग स्पर्धा परीक्षेसाठी होतो असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मकरंद शहापुरकर यांनी संसक्काराचे मोती या स्वतंत्र पानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन्यजिवांची माहितीचा खजिना देण्यात येत आहे. त्यात देशातील वेगवेगळ्या भागात असलेल्या वन्य प्राण्यांचे महत्व आणि त्यांची आजची स्थिती या बद्दल सविस्तर माहिती दिली जात असल्याने ते विद्यार्थ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे सांगितले.
मुलींनी निडर राहावे
शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतींना काही टवाळखोरांकडून त्रास देण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. परंतु त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी स्वतंत्र दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. हे पथक कायम फिरतीवर असते. कुठल्याही ठिकाणांहून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार होत असतील तर आम्ही लगेचच तेथे पोहचून संबधित टवाळखोरांना अटकाव करतो. तसेच निनावी तक्रार दिल्यास त्यांचीही आम्ही दखल घेत असल्याचे दामिनी पथक प्रमुख नालंदा लांडगे यांनी यावेळी सांगून मुलींनी न घाबरता शिक्षण घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.