नाथानी विद्यालयात विज्ञान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:42+5:302021-03-04T04:57:42+5:30
रस्त्यावर खड्डे जालना : जालना शहरातील मंमादेवी ते रेल्वेस्थानक परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे ...
रस्त्यावर खड्डे
जालना : जालना शहरातील मंमादेवी ते रेल्वेस्थानक परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. अनेकवेळा रस्ता दुरूस्तीची मागणी करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
वायाळ पांगरीत निवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार
जालना : मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक व्ही.एस. पुणेकर, मुख्याध्यापक पी.सी. चव्हाण हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन सोनटक्के, जीवन तालेवार हे उपस्थित होते.
निरखेडा येथे शेती दिनानिमित्त मार्गदर्शन
जालना : तालुक्यातील निरखेडा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेती दिन घेण्यात आला. शाळा समन्वयक नंदकिशोर पुंड, कृषी सहाय्यक वर्षा कुलकर्णी, मुकुंद ढवळे, नामदेव जाधव, गंगाधर जाधव, गजानन जाधव, अनिल पुरी यांची उपस्थिती होती. नंदकिशोर पुंड यांनी हरभरा काढणी तंत्रज्ञान उत्पादन व्यवस्थापन व प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.