सीड्स पार्कच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी : डीपीआर तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:20 AM2021-06-27T04:20:19+5:302021-06-27T04:20:19+5:30
शनिवारी सकाळी या अधिकारी तसेच उद्योजकांनी पानशेंद्रा येथे भेट देऊन जागा पाहिली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. ...
शनिवारी सकाळी या अधिकारी तसेच उद्योजकांनी पानशेंद्रा येथे भेट देऊन जागा पाहिली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जालन्यात या आधीच बियाणे उद्योग रुजलेला आहे, त्याला आता नवीन काळानुरूप बदलाची जोड देण्याची गरज वर्तविण्यात आली. त्यात या सीड्स पार्कमध्ये लहान कंपन्यांसाठी प्रोसेस युनिट उभारणे, गोदाम, शीतगृह तसेच अन्य सुविधा उभारण्यावर चर्चा झाली. जागा उपलब्ध असून, तेथे गुंतवणूक होणे गरजेचे आहे. असे उद्योजकांनी यावेळी नमूद केले. रेखावर यांनी सविस्तर माहिती घेतली.
अन्य राज्यांचा अभ्यास करणार
सीड्स पार्क उभारण्यासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांत सीड्स पार्क या आधीच विकसित झालेले आहेत. त्यमुळे तेथे गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना वीजबिलात सवलत, करात सूट आणि अन्य सवलती देऊन ते पार्क विकसित केले आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर जालन्यात या सुविधा देण्यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच महाबीजने या सीड्स पार्कचा डीपीआर तयार करून तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यावरही बैठकीत एकमत झाले.