भोसले यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:29+5:302021-04-10T04:29:29+5:30
१६० जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस जालना : कृषी उत्पादक व विक्रेता असोसिएशनच्या वतीने जालना येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण ...
१६० जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
जालना : कृषी उत्पादक व विक्रेता असोसिएशनच्या वतीने जालना येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये १६० जणांनी लस घेतली. यावेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर, अतुल लढ्ढा, पुरूषोत्तम जयपुरिया, गोपाल मानधना, बालाप्रसाद भक्कड, योगेश शिंदे, सुशांत लढ्ढा आदींची उपस्थिती होती.
लसीकरण शिबिर आयोजकांचा सत्कार
जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावात कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्त्वाचे ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करणाऱ्यांचा लाॅयन्स क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष सत्यनारायण सारडा, शहराध्यक्ष कशन भक्कड, अशोक बजाज, आशिष भुतडा, लॉयन्सचे पुरूषोत्तम जयपुरिया, सुभाष देविदान, अतुल लड्डा, अरूण मित्तल आदी उपस्थित होते.
वाढत्या उन्हामुळे अबालवृद्ध हैराण
जालना : गत काही दिवसापासून उन्हाचा पारा ४० अंशाच्या पुढे जात आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजाराचे रूग्ण सध्या वाढत आहेत. वाढत्या रूग्णसंख्यमुळे खासगी दवाखाने फुल्ल दिसत आहेत. विशेषत: वाढत्या उन्हाचा सर्वाधिक त्रास अबाल-वृध्दांना सहन करावा लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, विनाकारण घराबाहेर फिरणे टाळणे गरजेेचे आहे.
राज्य महामार्गावरील सूचना फलक गायब
जालना : जालना ते देऊळगाव राजा मार्गावरील सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. फलक नसल्याने चालकांची गैरसोय होत असून, अपघातप्रणव क्षेत्रातील अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही बाब पाहता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या मार्गावर गरजेच्या ठिकाणी दिशादर्शक, सूचना फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.